Top Recommended Stories

Samruddhi Mahamarg : लोकार्पणाच्या पूर्वीच समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचा गर्डर पडला, तीन दिवसातली ही दुसरी घटना!

Samruddhi Mahamarg : बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी पुलाच्या खाली ट्रेलर उभा होता. या ट्रेलरवर गर्डर पडल्यामुळे तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला. सुदैवाने या ट्रेलरमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.

Published: April 28, 2022 10:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

samruddhi mahamarg
samruddhi mahamarg

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) निर्माणाधीन पुलाचा मोठा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. लोकार्पणाच्या आधीच समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील पुलाचा मोठा गर्डर कोसळला (girder of bridge under construction collapsed). या गर्डर खाली एक ट्रेलर गाडला गेला. पण सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा या गावाजवळ पुलाचा गर्डर कोसळला. दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी पुलाच्या खाली ट्रेलर उभा होता. या ट्रेलरवर गर्डर पडल्यामुळे तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला. सुदैवाने या ट्रेलरमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.

You may like to read

जवळपास 200 टन वजनाचा हा गर्डर असून तो 80 फुटांवरुन खाली कोसळला. या दुर्घटनेमुळे पुलाचे मोठे नुकसान जाले आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. समृद्धी महामार्गाचं काम वेगात सुरु असून लोकार्पणाच्या घाईत अशा दुर्घटना होत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधी समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच गर्डर कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केले जात आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 28, 2022 10:20 AM IST