सांगली: मैत्रीच्या (Friendship) नात्याला काळीमा फासणारी घटना सांगलीमध्ये (sangli) घडली आहे. सिगारेट (Cigarettes) आणायला उशीर झाल्यामुळे सांगतील दोन जणांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या (Friend Murder) केली. ऐवढ्यावर न थांबता त्यांनी मित्राच्या मृतदेहाचे तुकटे करुन बोअरवेलमध्ये टाकले. मिरज (Miraj) तालुक्यातील भोसे गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी (Miraj Police) दोन जणांना अटक केली आहे.Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

दत्तात्रय झांबरे (24 वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल उर्फ धर्मराज खामकर (27 वर्षे) आणि सागर सावंत (25 वर्षे) अशी आरोपींची नावं असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 28 जुलै रोजी दत्तात्रय गावातून गायब झाला. त्याच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावभर त्याचा शोध घेतला. शेवटी त्यांनी 29 जुलै रोजी पोलिस ठाण्यात (Police Station) धाव घेत तक्रार केली. त्यावेळी दत्तात्रयच्या कुटुंबीयांनी अमोल आणि सागर त्याचे चांगेल मित्र असल्याचे सांगत तो शेवटी त्यांच्यासोबत होता असे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास सुरु केला. यावेळी दत्तात्रयच्या मित्रांनीच त्याची हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

मिरज ग्रामीण पोलिसांनी अमोल आणि सागर दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दत्तात्रयची हत्या केल्याची कबूली दिली. 28 तारखेला तिघे मित्र दारु पार्टी करत होते. पार्टी सुरु असताना अमोल आणि सागर यांनी दत्तात्रयला सिगारेट आणायला पाठवले होते. सिगारेट आणायला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या अमोल आणि सागरने दत्तात्रयच्या अंगावर कोयत्याने सपासप वार करत डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या (Murder Case) केली. ऐवढ्यावर न थांबता दोघांनी दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि बोअरवेलमध्ये टाकले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल आणि सागर दोघांना अटक केली आहे. दोघांनाही कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दत्तात्रयच्या कुटुंबीयांना केली आहे. Also Read - Big News: कर्मपूजा उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, 7 मुलींचा तलावात बुडून मृत्यू!