Top Recommended Stories

Sangli Mass Suicide Case : सांगली सामूहिक आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, विष घालून हत्या केल्याचे तपासात उघड!

Sangli Mass Suicide Case : वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून त्यांची हत्या (Sangli Murder Case) करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. विषारी औषध घालून या नऊ जणांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही जण सांगलीतील आहेत.

Published: June 27, 2022 7:55 PM IST

By Priya More | Edited by Priya More

Sangli Mass Suicide Case
Sangli Mass Suicide Case

Sangli Mass Suicide Case : सांगली (Sangli) येथील सामूहिक आत्महत्या प्रकरणाला (Sangli Mass Suicide Case ) वेगळे वळण आले आहे. याप्रकरणाचा कसून तपास सांगली पोलिसांकडून सुरु होता. या पोलिस (sangli police) तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून त्यांची हत्या (Sangli Murder Case) करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. विषारी औषध घालून या नऊ जणांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही जण सांगलीतील आहेत.

20 जून रोजी सांगलीतल्या म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह घरामध्ये आढळले होते. या सर्वांनी विष घेऊन सामूहिक आत्महत्या केली असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती आणि संपूर्ण सांगली हादरली होती. वनमोरे कुटुंबावर कर्ज होते या कर्जाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली असल्याचे सुरुवातीला तपासातून समोर आले होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण आले असून त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

You may like to read

सांगली पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) या दोघांना वनमोरे कुटुंबियांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. मयत डॉ. माणिक बल्लापा वनमोरे आणि पोपट यलाप्पा वनमोरे यांची गुप्त धनाबाबत एका अनोळखीसोबत भेटी होत होत्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीस पैसे दिले होते. तसेच ती व्यक्ती वरचेवर रात्रीच्या वेळी म्हैसाळ येथील वनमोरे यांच्या घरी येत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यामाहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सर्व चक्र फिरवली आणि ही धक्कादायक माहिती तपासातून समोर आली. या दोघांनीच वनमोरे कुटुंबातील 9 जणांना विषारी औषध घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपींवर हत्येचे 302 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>