Top Recommended Stories

Sant Gadge Maharaj: कोण होते समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे बाबा? कसं सांगितलं शिक्षणाचं महत्त्व?

Sant Gadge Maharaj: समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे बाबा यांनी लोकांना वेगवेगळे उदाहणं देत अंधश्रदेतून देखील बाहेर काढण्यासाठी समाजप्रबोधातून जनजागृती केली आणि लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

Published: February 23, 2022 7:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Sant Gadge Maharaj: कोण होते समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे बाबा? कसं सांगितलं शिक्षणाचं महत्त्व?
Gadge Baba Parichay in marathi

Sant Gadge Maharaj: समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे बाबा (Sant Gadge Baba) यांनी लोकांना वेगवेगळे उदाहणं देत अंधश्रदेतून देखील बाहेर काढण्यासाठी समाजप्रबोधातून जनजागृती केली. शिक्षण ही किती मोठी आणि महत्त्वाची गोष्ट (importance of education) आहे हे सांगताना गाडगे महाराज म्हणायचे पैशाची कमतरता असेल तर जेवणाची भांडी विका, घारातील बाईसाठी कमी किमतीत कपडे घ्या, मोडक्या तुटक्या घरात राहा पण मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. आधुनिक भारताला अभिमान वाटेल अशा महापुरुषांमध्ये (Great men) राष्ट्रसंत गाडगेबाबा (Rashtrasant Gadge Baba) यांचे नाव सर्वोपरि आहे. मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतिक असे जर कोणाला मानले असेल तर ते संत गाडगे बाबा होते. गाडगे बाबा यांचे मूळ नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर (Debuji Zingarji Janorkar) होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेडगाव गावात (Gadge Baba Parichay in marathi) येथे झाला.

Also Read:

गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे डेबूजी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब आणि सामान्य रहाणी स्वीकारली होती. गाडगे महाराजांनी सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांवर समाजप्रभोधनाचं काम केलं. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. गोरगरीब आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. गाडगे बाबांचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग होता. ते कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि अज्ञानावर टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना गाडगे बाबा स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण देत.

You may like to read

कोण होते संत गाडगे बाबा?

गाडगे बाबा (Gadge Maharaj Parichay in marathi) यांचे खरे नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला. गाडगे महाराज हे भटके समाजसुधारक (Wandering social Reformer) होते. पायात फाटक्या चपला आणि डोक्यावर फुटलेल्या गाडग्याची वाटी आणि झाडू घेऊन घेऊन ते पायी प्रवास करायचे. त्यांचा हा पेहराव त्यांची ओळख होती. गाडगे महाराज गावागावात जाऊन स्वत झाडून गाव स्वच्छ करायचे. कोणत्याही गावात गेले की बाबाब गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे आणि काम आटोपल्यावर स्वतः गावातील लोकांना स्वच्छतेबद्दल शुभेच्छा द्यायचे आणि स्वच्छतेचे महत्त्व (importance of cleanliness) समजून सांगायचे.

लोकांमधील अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन

गाडगे बाबांची गावातील सेवा संपल्यानंतर लोक त्यांना पैसे द्यायचे आणि बाबा त्या पैशाचा सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करायचे. लोकांकडून मिळालेल्या पैशातून गाडगे महाराज गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांचे निवासस्थान बांधत. गावोगावी स्वच्छता केल्यावर ते संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करायचे आणि आपल्या कीर्तनातून लोकोपयोगी आणि समाजहिताचा संदेश द्यायचे. आपल्या कीर्तनाच्या वेळी ते लोकांमधील अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करायचे. ते आपल्या कीर्तनात संत कबीरांचे दोन दोहे देखील वापर होते.

कठोर परिश्रम, साधे राहणीमान आणि परोपकाराचे धडे

संत गाडगे महाराज हे माणसांना प्राण्यांवरील अत्याचारापासून रोखायचे आणि समाजातील जातीभेद आणि वर्णभेद या मान्यतांविरुद्ध ते लोकांना जागरुक करायचे. समाजात पूर्णपणे दारूबंदी करण्यची गाडगे बाबा यांची इच्छा होती. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, साधे राहणी आणि परोपकाराचे धडे देत असत. ते नेहमी गरजूंना मदत करण्यास सांगत. त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलांनाही याच मार्गावर जाण्यास सांगितले होते.

राज्य आणि केंद्र सरकारने केला सन्मान

गाडगे महाराजांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने 2000-01 मध्ये ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ सुरू केले. गाव स्वच्छ ठेवणाऱ्या ग्रामस्थांना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार दिला जातो. गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांपैकी एक होते. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कारही जारी केले. एवढेच नाही तर अमरावती विद्यापीठालाही त्यांचं नाव देण्यात आलं. संत गाडगे महाराज हे भारतीय इतिहासातील महान संत होते. 20 डिसेंबर 1956 रोजी महाराजांचे निधन झाले. परंतु त्यांचे विचार आणि आदर्श आजही सर्वांच्या हृदयात जिवंत आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 7:00 AM IST