Job in Mahavitaran: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Job in Mahavitaran: तुम्ही उच्चशिक्षित आहात आणि नोकरीच्या शोधात (Sarkari Naukari) असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नोकरीची (Job in Maharashtra) संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (mahavitaran) आणि महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी 'महानिर्मिती'मध्ये (mahagenco) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Job in Mahavitaran: गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी (Sarkari Naukari) गेली. त्याचबरोबर अनेकांचे उद्योगधंदे देखील ठप्प झाले आहेत. अशात अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (Mahavitaran) आणि महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी अर्थात महाजनको (mahagenco) नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार अर्ज करु शकतील.
Also Read:
- Sharad Pawar Birthday : 82 वर्षांचे झाले शरद पवार, देशाच्या सर्वात प्रभावशाली नेत्याचा असा आहे राजकीय प्रवास!
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच! ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, NCPची खोचक टीका
- मोठी बातमी! सीमावाद पेटला असताना 100 हून जास्त गावांना नको झाला महाराष्ट्र, जाणून घ्या कारण...
> महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., बीड
– पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन
– शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT
> एकूण जागा – 94
– इलेक्ट्रिशियन पदासाठी – 47 जागा
– वायरमन पदासाठी 47 जागा
> अर्ज करण्याचा पत्ता –
अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित,
विद्युत भवन,
जालना रोड, बीड
> अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मे 2022.
नोकरीचा तपशील आणि पद संख्येबाबत सविस्तर माहितीसाठी अर्ज करू इच्छित उमेदवारांनी www.mahadiscom.in वर व्हिजिट करा.
> महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मुंबई.
> मुख्य अभियंता (chief engineer)
एकूण 7 जागा.
काय आहे शैक्षणिक पात्रता…
-इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी आवश्यक.
– 15 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
> उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
एकूण 11 जागा.
काय आहे शैक्षणिक पात्रता…
इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी आवश्यक.
– 14 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – 48 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022.
> अधिक्षक अभियंता (Superintending Engineer)
एकूण 23 जागा.
काय आहे शैक्षणिक पात्रता…
– इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी आवश्यक.
– 12 वर्षांचा अनुभव आवश्यक.
– वयोमर्यादा – 45 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
Assistant General Manager (HR-RC),
Maharashtra State Power Generation Co.Ltd.,
Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,
Mumbai– 400 019.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या