Top Recommended Stories

Satara Rape Case: शिकवणीच्या बहाण्याने मामानेच केला भाचीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण आलं समोर!

Satara Rape Case: पीडित मुलीच्या तक्रारीवरुन मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मामाला वाई पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: February 4, 2022 11:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Satara Rape Case
Rape Case in delhi

Satara Rape Case : साताऱ्या (Satara) जिल्ह्यातल्या वाईमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अभ्यास घेण्याच्या बहाण्याने मामानेच आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार (Satara Rape Case) केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती (Girl Got Pregnant) राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मामाला वाई पोलिसांनी (Vai Police) अटक केली आहे.

Also Read:

मिळालेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यामध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी तिच्या मामाकडे अभ्यासासाठी जात होती. मामाने अभ्यास घेण्याच्या बहाण्याने तिच्यावर ऑक्टोबरमध्ये बलात्कार केला. त्यानंतर कोणाला न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करत राहिला. परत नोव्हेंबर आणि डिंसेबरमध्ये सुद्धा त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात घेऊन गेले. तर त्यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

You may like to read

पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. तर त्यांना धक्का बसला कारण पीडित मुलीच्या मामानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. त्यांनी तात्काळ वाई पोलिस ठाण्यात घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन मामा विरोधात बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मामाला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 4, 2022 11:20 AM IST

Updated Date: February 4, 2022 11:20 AM IST