
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Maharashtra Floor Test Updates: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या फ्लोर टेस्टविरोधातील याचिकेवर सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव सरकारची याचिका फेटाळून लावली. याचाच अर्थ आता गुरुवारी उद्धव सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून केला होता. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता न्यायालयाने देखील उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचे सांगितले आहे.
तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत गुरुवारी महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निर्देश बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना प्रतिसवाल केला. एखाद्या सरकारने सभागृहात बहुमत गमावले आणि ज्यांनी पाठिंबा काढून घेतला त्यांना अपात्र ठरवण्यास सभापतींना सांगितले जात असेल तर राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची वाट पहावी का? असा प्रतिसवाल न्यायालयाने केला.
प्रभू यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर राज्यपाल मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य करण्यास बांधील आहेत, असा युक्तिवाद केला. तसेच ते म्हणाले की, राज्यपाल मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करू शकतात किंवा करू शकत नाहीत. परंतु ते कोणत्याही परिस्थितीत विरोधकांच्या सल्ल्यानुसार काम करू शकत नाहीत. जर बंडखोर आमदारांना गुरुवारी मतदान करण्याची परवानगी दिली तर न्यायालय अशा आमदारांना परवानगी देईल ज्यांना नंतर अपात्र ठरवले जाऊ शकते आणि ते लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या