Top Recommended Stories

School Reopen in Maharashtra: शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पुन्हा शाळा सुरू होणार आहे. सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यात सर्व शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.

Updated: January 20, 2022 8:12 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

School Reopen in Maharashtra: शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
delhi Schools

School Reopen In Maharashtra: राज्यातील विद्यार्थी (Students), पालक (Parents) आणि शिक्षकांसाठी (Teachers)  महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पुन्हा शाळा (School Reopen) सुरू होणार आहे. सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यात सर्व शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. राज्यात कोरोना व्हायरस (Corona Virus)आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वाढल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Also Read:

शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी…

महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून या संदभात परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्याची सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करायच्या की नाहीत, याबाबत निर्णय घेतील. तर इतर ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शाळा सुरू करण्याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तर 15-18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळेतच लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल, असे शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

You may like to read

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पणे पालण करून शाळा सु सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली होती. त्यांनी शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, अशाच शहरात शाळा सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात सरसकट शाळा सुरु होणार नाही!

राज्य सरकारच्या निर्णयानंतर येत्या 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार, शाळा सुरू करण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरु होणार नसल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारकडून देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिले होते. कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांच्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. 15 फेब्रुवारीपर्यत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

नाशिक आणि नवी मुंबईत शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शाळा सुरु ठेवणार का? असा सवाल देखील शिक्षणमंत्र्यांना केला जात होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 2:18 PM IST

Updated Date: January 20, 2022 8:12 PM IST