Top Recommended Stories

Schools Open In Maharashtra: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळेबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

राज्यभरातील कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रादूर्भाव आटोक्यात येत असताना राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासननिर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू (100 % Schools Opened in Maharashtra) करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने परवानगी दिली आहे.

Published: March 24, 2022 8:45 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Karnataka, karnataka schools, belagavi, belagavi schools closed, leopard
Karnataka: This is the third day in a row that the schools have been closed in Belagavi. (File Photo)

Schools Open In Maharashtra: राज्यभरातील कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रादूर्भाव आटोक्यात येत असताना राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासननिर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू (100 % Schools Opened in Maharashtra) करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय एखाद्या शाळेला रविवारी शाळा भरवायची असेल तर त्यासाठी देखील परवानगी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर तब्बल दोन वर्षांनी पहिल्यांदाच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात होते. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करून शाळा सुरु (schools open in Maharashtra) करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले होते. आता राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

You may like to read

सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र, या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिलअखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू करावे, असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्यास परवानगी…

शाळा शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात, असे देखील आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवण्याची परवानगी असेल, असे देखील सांगण्यात आले आहे.

परीक्षा एप्रिलमध्ये आणि निकाल मे महिन्यात..

शाळांनी परीक्षा कधी घ्याव्यात, याबाबत देखील शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावा, असे देखील आदेशात म्हटले आहे.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>