मुंबई: कोरोना व्हायरसचा (Covid 19) संसर्ग आटोक्यात आल्यानंतर आता शाळा सुरू (Schools Reopen in Maharashtra) करण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी मुंजरी दिली आहे. राज्या पाठोपाठ आता मुंबईतील देखील येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळा (Schools reopen in Mumbai) सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) मुंबईत शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.Also Read - Guidelines for Festival Season: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! केंद्रानं केलं राज्यांना अलर्ट

राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुन मुंबईतील शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. मुंबईत सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. इतर वर्गाच्या शाळा कधी सुरू करायच्या याबाबतचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. शहरातील महापालिका शाळा (BMC Schools), खासगी व्यवस्थापन (Private Schools) आणि इतर मंडळांच्या शाळांना सुचना देण्यात आल्या आहेत. Also Read - Breaking News Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, आई देखील कोरोनाबाधित, घरीच उपचार सुरू

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोना व्हायरसचं संकट अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं जाहीर केलेल्या नियमानुसार मुंबईतल्या शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं असल्याचं महापौरांनी यावेळी माहिती दिली. Also Read - Fire In Mumbai: लालबागमध्ये 60 मजली रहिवासी इमारतीला भीषण आग, 19व्या मजल्यावरुन पडून एकाचा मृत्यू

काय आहे नियमावली?

– एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.
– विद्यार्थ्याला शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक.
– सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.
– शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.
– शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असेल.
– मास्क घालणं अनिवार्य असेल.
– शाळेत सॅनिटायजरचा वापर करणं अत्यावश्यक.

काय आहेत महत्त्वाच्या सूचना..

-मुंबई विभागातील शाळा सुरु करण्यासाठी संस्थांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-आवश्यकतेनुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना उपस्थित ठेवावे.
-शाळा सुरु करण्याआधी आणि सुरु केल्यानंतर आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांची योग्य पद्धतीने कार्यवाही करावी.
– महापालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडिअम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जुंतुकीकरण करण्यात येणार आहे.
– खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या स्तरावर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना पालिकेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.