सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला (ganapatrao deshmukh passed away) आहे. सोलापूरमधील (Solapur) एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. गणपतराव देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी सांगोल्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Also Read - Solapur News: हृदयद्रावक! पत्नीची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी, पहिल्या पत्नीनेही तिथेच दोन मुलांसह दिला होता जीव

11 वेळा आमदार (11 th time MLA) होण्याचा विक्रम केलेले गणपतराव देशमुख संपूर्ण महाराष्ट्रात आबासाहेब म्हणून परिचित होते. विधानसभेत (Vidhansabha) एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. देशमुख यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. Also Read - Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत तीन मोठे निर्णय! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात देशमुख यांचा जन्म झाला. पण वकिली (Lawyer) व्यवसायामुळे ते सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले होते. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे (Congress) वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. ते राज्याचे कृषी ( Minister of Agriculture), ग्रामविकास (Rural Development), न्याय (Justice), पणन, रोजगार हमी (Marketing and Employment Guarantee ) या खात्यांचे मंत्री होते. तसंच 2009 साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. Also Read - Maharashtra Political Crisis Live Update: "याचा अर्थ काय?" मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. ‘राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले.’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व केले हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे वैशिष्ट होते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.