मुंबई: बॉलिवूडमध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणानं खळबळ उडवून दिली असताना आणखी एका सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश झाला आहे. मुंबईच्या क्राइम ब्रँचनं (Mumbai Crime Branch) टॉप मॉडेल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला जुहू येथील फाइव्ह स्टार हॉटेलमधून (Five Star Hotel, Juhoo) ताब्यात घेतलं आहे. चौकशीनंतर दोघींची पोलिसांनी सूटका केली आहे. या प्रकरणात इशा खान नावाच्या एका महिला दलालला पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे.Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर (Manish Shridhankar) यांनी दिलेल्या माहिती अशी की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून इशा खानच्या मागावर होते. इशा गेल्या काही वर्षांपासून सेक्स रॅकेट (Sex racket) चालवत होती. इशा खानबद्दल पोलिसांना टीप देखील मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकानं जुहू येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून मॉडेल आणि अभिनेत्रीची सूटका करून इशा खानला अटक केली. Also Read - Urvashi Rautela Learning Martial Arts: उर्वशी रौतेला घेतेय मार्शल आर्टची ट्रेनिंग, व्हिडिओ पाहून म्हणाल 'अप्रतिम'

इशा खान ही कस्टमरकडून एका तरुणीसाठी दोन तासांचे दोन लाख रुपये घेत होती. या दोन लाखातून इशा खानला 50 हजार रुपये मिळायचे तर तर तरुणीला दीड लाख रुपये मिळायचे, अशी धक्कादायक माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

असा रचला सापळा…

क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्यानं बनावट ग्राहक बनून इशा खानला फोन केला. टॉप मॉडल्सची मागणी करताच इशानं अनेक फोटो पोलिस अधिकाऱ्याला व्हॉट्सअॅप केले. त्यापैकी अधिकाऱ्यानं दोन फोटो सिलेक्ट करून पाठवले. यापैकी एक टॉप मॉडेल असून अनेक जाहिरातींमध्ये झळकली आहे तर दुसरी टीव्ही अभिनेत्री असून तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

बनावट ग्राहक बनून पोलिस अधिकाऱ्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये एक रुम बुक केला. गुरुवारी रात्री महिला दलाल इशा खान, मॉडेल आणि अभिनेत्री जशा हॉटेलमध्ये पोहोचल्या. क्राइम ब्रान्चच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलं. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू झाला होता. त्यामुळे जाहिरात आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात यावं लागलं, अशी माहिती मॉडेल आणि अभिनेत्रीनं दिली. चौकशीनंतर पोलिसांनी दोघांची सूटका केला आहे. महिला दलाल इशा खान हिला अटक करण्यात आली आहे.