मुंबई: राज्यात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. त्यात तिसऱ्या लाट (Third Wave of Covid 19) येण्याची शक्यता देखील कमी असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी शाळा, महाविद्यालये कधी (Shala Kadhi Suru Honar) सुरू होणार, यावर भाष्य केलं आहे.Also Read - 'पहचान कौन' आणि 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा', नवाब मालिकांच्या ट्वीट्सनी उडवून दिली खळबळ

राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. Also Read - Digital Fraud: तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, श्रद्धेच्या नावाखाली घातला जातोय डिजिटल गंडा

दिवाळीनंतर शाळा सुरू होणार?

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्याचा आता विद्यार्थ्यांना कंटाळा आला आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. पुढील महिन्यात नवरात्रौत्सव, दसरा आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. गेल्यावर्ष या दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेऊन दिवाळीनंतर राज्यात शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. Also Read - Raj Thackeray Covid Positive: राज ठाकरेंनी आता तरी मास्क परिधान करावा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

राज्यात महाविद्यालये देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, याबाबत देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. लहान मुलांचं लसीकरण झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अंतिम निर्णय हा शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यानंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले.

आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू

राज्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका नाही

राज्यात तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविदयालये लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.