मुंबई: महापूरामुळे (Flood in Maharashtra) बेघर झालेल्या 16 हजार पीडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या (Rashtrawadi Welfare Trast) माध्यमातून सुमारे 20 हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत केली. सहा जिल्ह्यातील चार जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी दिलेल्या बाधित क्षेत्रातील लोकांना औषधोपचार करण्यासाठी जाणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना हिरवा कंदील शरद पवार यांनी दाखवला.Also Read - Terror Module: महाराष्ट्र ATSने मुंब्र्यातून संशयित दहशतवादी 'मुन्नाभाई'ला केली अटक

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांच्या मतदारसंघात माळीण येथे जी घटना घडली होती. त्याची माहिती देताना त्या लोकांचे कसे संपूर्ण पुनर्वसन करणं आव्हान होतं. मात्र ते आव्हान पेलत पुनर्वसन करण्यात सरकार यशस्वी झाल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले. या महापूरामुळे 16 हजार घरे म्हणजेच 16 हजार कुटुंबांना मदत द्यायची गरज आहे. यामध्ये रत्नागिरी- चिपळूण – खेड यामध्ये 5 हजार, रायगड जिल्ह्यात – 5 हजार, कोल्हापूर 2 हजार, सांगली 2 हजार, सिंधुदुर्ग – 500 सातारा -1 हजार आदींचा समावेश आहे. Also Read - BIG NEWS: बाप्पाला निरोप देताना वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून 16 हजार लोकांना 20 हजार घरगुती भांडी, याशिवाय ज्या घरांचे नुकसान झाले त्यातील लोकांना 20 हजार अंथरुण – पांघरूण कीट (सोलापूरी चादरी) शिवाय एक लाख कोरोना प्रतिबंधक मास्क, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यावतीने डॉक्टरांची 250 पथके तपासणी व औषधे घेऊन दाखल झाली आहेत. याशिवाय गंभीर रुग्णांना औषधे व रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. 20 हजार बिस्किटे व टोस्ट ब्रिटानिया कंपनीकडून घेऊन वाटप करण्यात येणार आहे. Also Read - Breaking News Live Updates: "देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात"; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने येत्या दोन दिवसात हे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी खासदार सुनील तटकरे, रत्नागिरीची जबाबदारी आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, सिंधुदुर्गसाठी अरविंद सावंत, सातारसाठी मंत्री बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सांगली जिल्ह्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्यापरीने मदत करतील. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच माजी आमदार आणि ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत.