Top Recommended Stories

Sharad Pawar Tested Covid Positive : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

क्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहान पवारांनी केलं आहे.

Updated: January 24, 2022 6:47 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Sharad Pawar Tested Covid Positive : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

Sharad Pawar Tested Covid Positive: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. पवार यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह (Covid Positive) आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याची माहिती शरद पवार (following treatment suggested by doctor) यांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहान पवारांनी केलं आहे.

Also Read:

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे” असं ट्वीट करून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

You may like to read

राज्यात गेल्या काही दिवसामंध्ये अनेक राजकीय नेत्यांना (political leaders) कोरोना संसर्ग झाला आहे. आता शरद पवार यांना देखील कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. या दरम्यान त्यांना ट्विटरवरुन (Sharad Pawar Tweet) यासंदर्भात माहिती देत काळजी करण्याचं कारण नाही असे सांगितले आहे. गेले दोन दिवस शरद पवार बारामती आणि पुणे दौऱ्यावर होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा ती पॉझिटिव्ह आली, अशी माहिती आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एक कार्यक्रम नियोजित आहे. मात्र, आता त्यांना पवारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 3:17 PM IST

Updated Date: January 24, 2022 6:47 PM IST