औरंगाबाद:राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) शुक्रवारी औरंगाबादच्या (Aurangabad News) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचावल्या असून शिवसेना-भाजपची पुन्हा युती (Shiv Sena BJP Alliance) होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत मुख्यमंत्र्यानी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.Also Read - Breaking News Live Updates: NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार : नवाब मलिक

मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादेत आहेत. या कार्यक्रमाला एकाच मंचावर सर्वपक्षीय नेते उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून टोलेबाजी केली. मात्र, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं. आहे. ‘माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना-भाजपची युती होणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. Also Read - 'पहचान कौन' आणि 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा', नवाब मालिकांच्या ट्वीट्सनी उडवून दिली खळबळ

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘व्यासपीठावरचे माझे आजी माजी सहकारी, आणि भविष्यात पुढं पुन्हा एकत्र आले तर भविष्यातील सहकारी सगळ्यांचे स्वागत’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यावेळी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर सरकार तुमच्यासोबत असल्याचा शब्द देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याचेच संकेत मुख्यमंत्र्यानी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. Also Read - India vs Pakistan: पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर, VIDEO होतोय VIRAL

मनातील भावना बोलून दाखवली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात भाजप नेत्यांचा ‘माजी सहकारी आणि भविष्यातले सहकारी’, असा उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना- भाजप युतीचे (Shiv Sena – BJP Yuti) संकेत दिले असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांना शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलो नाही आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. तिन्ही पक्षात जी काही अनैसर्गिक आघाडी झाली, ती फारकाळ टिकू शकत नाही. कदाचित हे, मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असावं. त्यामुळे राज्यात नुकसान होत आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातील भावना बोलून दाखवली, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात होते. पुण्यातील देहू येथील कार्यक्रमात व्यासपीठावरून एकानं चंद्रकांत पाटील यांचा ‘माजी मंत्री’ असा उल्लेख केला होता, त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल’, असं सूचक वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केल्यानं शिवसेना-भाजप पुनहा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.