मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षाकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे (Dasara Melava) आयोजन केले जाते. हा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेसाठी खूप महत्वाचा असतो. त्याचसोबत शिवसेनेचा दसरा मेळावा हा फक्त पक्षापुरता मर्यादित नसून त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेले असते. मागच्या वर्षी कोरोनामुळे (Corona Virus) दसरा मेळावा ऑनलाईन (Online) घेण्यात आला होता. यावर्षी दसरा मेळावा कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शिवसेनच्या या दसरा मेळाव्याबाबत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. यावर्षी मात्र ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन (Off Line) पद्धतीने हा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्याची जागा देखील निश्चित झाली आहे.Also Read - Cruise Drugs Party Case: 'जेलमधून बाहेर आल्यावर वाईट काम करणार नाही', आर्यन खानचे समीर वानखेडेंना वचन!

दसरा मेळाव्याच्या जागेसंदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थवर (Shivtirth) नाही तर षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे मंत्री (Shivsena Ministers), वरिष्ठ नेते (Senior Leaders), उपनेते, आमदार (MLA), महापौर (Mayor) आणि काही नगरसेवक (Corporater) या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतील.’ मागच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात पार पडला होता. Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अलर्ट जारी, गैर काश्मीरी मजुरांना सुरक्षा छावणीत हलवण्याच्या सूचना

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटले की, शिवसैनकांमध्ये (Shivsainik) उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते. या दसऱ्या मेळाव्याला शिवसैनिक आवर्जुन उपस्थिती लावतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थवर येत असतात. पण कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतिर्थवर घेतला जात नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या ( Municipal elections) तोंडावर या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा