मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dussehra Melava 2021) मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav thackeray) यांचं भाषण सुरू आहे. आधी काही म्हणत होते मी पुन्हा येईन…आता म्हणतात मी गेलोच नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर घणाघाती टीका केली. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) देखील खरपूस समाचार घेतला.Also Read - प्रेमासाठी काय पण! 20 वर्षीय तरुणीला 77 वर्षीय वृद्धासोबत करायचंय लग्न! कारण ऐकून बसेल धक्का

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिक हेच माझं शस्त्र आहे. आपले आशीर्वाद घेण्याचा हा दिवस आहे. शस्त्रपूजनानंतर उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित शिवसैनिकांवर फुलं उधळली. ‘मी मुख्यमंत्री नाही तुमच्या घरातला सदस्य आहे. मी स्वत: कधी मुख्यमंत्री आहे, असं वाटू देत नाही आणि तुम्ही देखील वाटू देऊ नका.आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही. आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. Also Read - Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती! तुम्हीही करू शकता Application

संघाची आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. मग विरोधीपक्षाचे पूर्वज परग्रहावरून आले होते का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल केला. लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख केला. हिंदुत्त्वाला धोका आहे का? असा प्रश्न निर्माण झालाआहे. सावरकरांचं नाव उच्चारण्याची लायकी तरी आहे का, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते राजनाथ सिंहांवर निशाणा साधला. Also Read - राज ठाकरे Action Mode मध्ये! मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली मोठी माहिती

राजकीय जीवनातून बाहेरही पडलो असतो-

तुम्ही पाळलं असतं तर तुम्हीही मुख्यमंत्री झाला असता. कदाचित मी राजकीय जीवनातून बाहेरही पडलो असतो. मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं कारण मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं. ‘तुमच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवून दाखवलं आणि जबाबदारी स्विकारली.’ राजकारण हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्रकर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’ असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. पुढच्या महिन्यांत सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ई़डी, सीबीआयद्वारे आव्हान देऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.