मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) राजावाडी हॉस्पिटलमध्ये (Rajawadi Hospital Mumbai) एका तरुण रुग्णाचे डोळे उंदरानी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतिदक्षता विभागात (ICU) हा रुग्ण उपचार घेत आहे. बेशुद्ध अवस्थेतेतील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.Also Read - Kurla Building Collapse : कुर्ला इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

बेशुद्ध रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडले-

मिळालेली माहिती अशी की, श्रीनिवास यल्लपा (वय-24) असं रुग्णाचे नाव आहे. त्याला श्वास घेताना त्रास होत असल्यानं दोन दिवसांपूर्वी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवासचे डोळे चक्क उंदरांनी कुरतडल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडले असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी हॉस्पिटलमधील नर्सला सांगितलं असता त्यांनी अर्वाच्च भाषेत उत्तर दिल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. श्रीनिवासला मेंदूज्वर असून त्याच लिव्हर खराब असल्याचं समजतं. Also Read - Ajit Pawar Corona Positive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत म्हणाले...

हॉस्पिटलमध्ये उंदरांचा वावर-

राजावाडी हॉस्पिटलचा आयसीयु रूम तळ मजल्यावर आहे. तिथे उंदरांचा वावर आहे. श्रीनिवासचे डोळे उंदरानं कुरतडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. रूग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा व आजूबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. आयसीयू पूर्णपणे पॅक आहे. परंतु पावसाळा असल्यानं व आयसीयू खालच्या मजल्यावर असल्यानं दरवाजा उघडल्यावर उंदीर आत गेला असावा. सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी दिली आहे. Also Read - Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप, जाणून घ्या आता कोणाकडे आहे कोणतं खातं!

महापौरांचे चौकशीचे आदेश-

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकाराची दखल घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महापौरांनी म्हटलं की, ही अतिशय खेदजनक बाब आहे. रुग्ण व्हेंटीलेटरवर असल्यानं त्याला संवेदना जाणवल्या नाही. या प्रकाराची पूर्णपणे चौकशी केली जाईल. ही गंभीर बाब आहे.