SSC, HSC Exam 2022 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या (SSC-HSC) विद्यार्थ्यांना त्यांच्या या आधीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार आहे.

SSC-HSC Exam 2022 : कोरोना महामारीमुळे (Covid Pandemic) निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या (SSC-HSC) विद्यार्थ्यांना त्यांच्या या आधीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे.
Also Read:
- SSC GD Constable Notification 2022: जीडी कॉन्स्टेबलच्या 24,369 पदांसाठी बंपर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार!
- SSC JE Recruitment 2022 : ज्युनिअर इंजिनिअरच्या विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळेल पगार
- SSC-HSC Results : 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी लागणार निकाल!
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहाभाग विचारात घेऊन त्यांना 2021-22 या वर्षांकरिता सवलतीचे क्रीडा गुण तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववी व दहावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारतात घेऊन क्रीडा गुण देण्यात येणार आहे.
असे दिले जातील गुण…
जिल्हास्तरीय क्रीडा सहभाग – 10 गुण
राज्यस्तरीय क्रीडा सहभाग – 15 गुण
राष्ट्रीय क्रीडा सहभाग – 20 गुण
आंतरराष्ट्रीय क्रीडा सहभाग – 25 गुण
इंटरमिजिएटच्या आधारावर गुण…
कोरोना महामारीमुळे यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी एलिमेंटरी परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेत प्राप्त श्रेणीच्या आधारावर सवलतीचे गुण देण्यात येणार आहे. ही सवलत फक्त या वर्षासाठी आहे.
या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. हा निर्णय दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.
4 मार्चपासून सुरु होणार परीक्षा…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने 10 वी आणि 12 वी परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 4 मार्चपासून इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा होईल. तर 15 मार्चपासून इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा होणार आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी झाल्याचे लक्षात घेत यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने कोरोनाचे नियम पळत शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्र, उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्र, उपकेंद्रांची संख्या 21,349 इतकी आहे. कोरोनाची पार्शवभूमी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने खबरदारी घेत नियोजन केले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या