ST Workers Strike: एसटी कामगार ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल, परिवहन मंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा

वारंवार इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.

Published: January 8, 2022 11:11 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

ST Workers Strike
ST Workers Strike

ST Workers Strike : राज्य सरकारने (Maharashtra Government) पगारवाढ आणि वेतनवाढ यासंदर्भातल्या मागण्या मान्य केल्यानंतरही एसटी कर्मचारी (ST Workers) आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. वारंवार इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. अशामध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांनी पुन्हा एकदा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकारचे एसटी कामगारांबद्दल जसे दायित्व आहे तसेच दायित्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. त्यासाठी एसटी कामगार ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. प्रशासन हातावर हात ठेवून बसू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पुन्हा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Also Read:

राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) आणि आरटीओच्या (RTO) कामाचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर संपामुळे एसटीचे जवळपास 600 कोटींचे नुकसान झाले. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी भरती (Staff recruitment) करावी लागेल. एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत चार वेळा कामगारांना कामावर या म्हणून संधी दिली होती. त्यामुळे आता कामगारांवर करण्यात येत असलेली बडतर्फीची कारवाई मागे घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.

एसटी कामगारांना दोन महिन्यांचा पगार मिळाला नाही तर त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होईल याची आम्हालाही कल्पना आहे त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतोय की कामावर परत या. पण काही कामगार हे दुसऱ्या कामगारांना कामावर येऊन देत नाहीत. त्यामुळे कर्मचारी आणि एसटी दोघांचेही नुकसान होत आहे. एसटी कामगारांचे आंदोलन भरकटत चालले आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 8, 2022 11:11 AM IST