State government employees strike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप, सरकार कारवाईच्या तयारीत
State government employees on strike: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्यानुसार आज आणि उद्या दोन दिवस विविध मागण्यांसाठी 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

State government employees on strike: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्यानुसार आज आणि उद्या दोन दिवस विविध मागण्यांसाठी 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी हा संप पुकारला आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यानी नोकरभरती, जुनी पेन्शन योजना, अंगणवाडी, आशा वर्कर्स इत्यादींना सेवेत नियमित करावे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या कराव्यात आणि निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. या संपात महसूल आणि राज्य शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसह निमसरकारी कर्मचारीही सहभागी होत असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे राज्य सरकारकडून या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता आहे. सरकारकडून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. संदर्भात एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यानुसार सरकार संपाबाबत ‘काम नाही, तर वेतन नाही’ हे धोरण राबवणार आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देखील परिपत्रकातून देण्यात आली आहेत.
दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले होते. राज्यात एक दिवस संप देखील केला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या