Top Recommended Stories

IIT Student Suicide: पवई आयआयटीमध्ये हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

IIT Student Suicide : तणावात येऊन हे पाऊल उचलत असल्याचे दर्शन मालवीयने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Published: January 17, 2022 2:05 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Powai IIT
Powai IIT

IIT Student Suicide : मुंबईच्या पवई आयआयटीमध्ये (Powai IIT) एका विद्यार्थ्यांने आत्महत्या (Powai IIT Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 वर्षीय दर्शन रामधन मालवीया असं या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शनने हॉस्टेलच्या इमारतीच्या (Hostel Building) सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन संपवले आहे. दर्शन मालवीय हा विद्यार्थी मुळचा मध्य प्रदेशच्या (Madya Pradesh) इंदोरचा (Indor) राहणारा होता.

Also Read:

You may like to read

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडे चारच्या सुमारास दर्शन मालवीय याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात (Powai Police Station) दर्शनच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दर्शनने सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्याने तणावात येऊन हे पाऊल उचलत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दर्शनच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दर्शनच्या आत्महत्येची माहिती मिळताच पवई पोलिसांनी (Powai Police) घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) पाठवण्यात आला आहे. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दर्शनच्या कुटुंबीयांना पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 17, 2022 2:05 PM IST