मुंबई : कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) शिक्षण क्षेत्राला (education department) मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे (Covid-19) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शाळा, कॉलेज बंद (Schools, Colleges closed) असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. अशामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द (10th and 11th exam canceled) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. त्यानंतर सरकारने अकरावीच्या प्रवेशाबाबत (Eleventh Admission) देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.Also Read - Rohit Sharma Tested Covid Positive: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने अकरावीच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा (written exam) घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Scince) आणि सामाजिकशास्त्र (Sociology) या विषयांच्या राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमाआधारे (Based on State Curriculum) ही परीक्षा होणार आहे. सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असून जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असली तरी सुद्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. Also Read - Corona Vaccine for Children: आनंदवार्ता! 7 ते 11 वयोगटातील मुलांचे लवकरच लसीकरण, या लसीच्या वापराला मिळाली मंजुरी

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे दिला जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेशाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर शिक्षण विभागाकडून (Education Department) हा स्वतंत्र प्रवेश प्रक्रियेचा तोडगा काढण्यात आला आहे. सीबीएसईसह (CBSE) इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (National and International), खासगी मंडळाचे विद्यार्थीही ही परीक्षा देऊ शकतील. अकरावी प्रवेश परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या (Commissioner of Education) अध्यक्षतेखाली समिती देखील नेमण्यात आली आहे. Also Read - शिवसेना नेते अर्जुन Arjun Khotkar यांच्यावर ईडीची कारवाई, जालन्यातील कारखान्याची 200 एकर जमीन जप्त

लेखी परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या प्रत्येक विषयांचे 25 गुणांचे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ असेल. महत्वाचे म्हणजे, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी शुल्क (Fees for the exam) भरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी भरलेले शुल्क अकरावी प्रवेश परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. पण, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार आहे. तसंच, परीक्षेचे अर्ज दहावीच्या निकालानंतर उपलब्ध होतील.