(संदीप शिंदे)
सोलापूर: ‘शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं’, हे समीकरण ओळखून निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानं सेंद्रीय पद्धतीनं इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करत अंजिराची शेती (Fig Farming) फुलवली. आत्माराम शेळके असं या आधुनिक शेतकऱ्याचं नाव आहे. शेळके यांनी हा प्रयोग करून पाहिला आणि चमत्कार झाला. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. एवढंच नाही तर पोलिस अधिकाऱ्यानं अशा प्रकारे पारंपरिक शेती करणाऱ्या बळीराजाला लखपती बनण्याचा मार्ग दाखवला आहे. शेळके यांना माळरानात अंजिराची शेती फुलवून 1 लाख 10 हजारांचं उत्पन्न घेतलं. रोपे लागवडीसाठी शेळके यांना 10 हजार रुपये खर्च आला होता.Also Read - Eknath Shinde Not Reachable: उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज आहेत एकनाथ शिंदे.. जाणून घ्या शिवसेना आमदारांच्या मनातील खदखद!

पौष्टिक आणि बहुगुणी असलेल्या अंजिराला बाजारात चांगली मागणी आहे. हा विचार डोक्यात ठेवून आत्माराम शेळके यांनी अंजिर लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे, मुंबई, नेहरु नगर यासह अन्य भागात आत्माराम शेळके यांनी
सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी ड्युटी बजावली. मात्र, निवृत्त झाल्यानंतर घरी बसून करणार तरी काय, असा प्रश्न स्वत:ला विचारत शेळके यांनी माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) गावच्या माळरानावर अंजिराची शेती फुलवली. मुलगा नागेश यांने देखील या कामात वडिलांना मदत केली. बापलेकाच्या परिश्रमातून अंजिराला गोडवा मिळाला आहे. Also Read - Maharashtra Political Crisis: Eknath Shinde यांची Facebook Post होतेय व्हायरल, भाजपमध्ये जाण्याचे दिले संकेत?

आत्माराम शेळके यांनी सांगितलं, अंजनगाव (खेलोबा) गावच्या माळरानावर वडिलोपार्जित शेतात एकर क्षेत्रावर अंजिराची लागवड करण्याचा प्रस्ताव कुटूंबीयांसमोर मांडला. सुरुवातीला कुटूंबातील सदस्यांनी निरुत्साह दर्शवला. मात्र शेळके यांनी अंजिर शेतीचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. अखेर कुटूंबातील सदस्यांचा शेळके यांनी होकार मिळवला. शेळके यांनी पुण्यातून अंजिराचे रोपं आणून 10×10 अंतरावर अंजिराची लागवड केली. सोशल माध्यमाचा वापर करून शेळके यांनी आपल्या अंजिराला बाजारपेठ मिळवून दिली. एका हंगामात 1 लाख 10 हजारांचं उत्पन्न घेतलं. रोपे लागवडीसाठी शेळके यांना 10 हजार रुपये खर्च आला होता.
Also Read - Raj Thackeray Health Update: राज ठाकरे यांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट, 'हिप बोन'ची सर्जरी यशस्वी

संकटांशी केले दोन हात…

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा बहुतांश व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यात सर्वाधिक शेती क्षेत्राला बसला.अस्मानी अन् सुलतानी संकटाचा सामना करणे हे शेतकऱ्यासाठी नवी गोष्ट नाही. मात्र अशा संकटाशी दोन हात करत निवृत्त पोलिस अधिकारी आत्माराम शेळके यांनी योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर अंजिराच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. अंजिराच्या शेतीत आंतरपिक म्हणून मिरचीची लागवड केली होती. त्यास देखील सेंद्रीय खताचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक संकटासह कोरोनासारख्या आपात्कालीन परिस्थितीत या योध्यानं निर्धारानं सामना केला. सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे अशा दृष्टीकोनातून पाहिल्यास त्यांना देखील कोट्यावधीचा टर्न ओव्हर करता येऊ शकतो, हेच निवृत्त पोलिस अधिकाऱ्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

योग्य नियोजन ठरलं ‘सक्सेस मंत्र’

खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव यावर आत्माराम शेळके यांनी जालीम उपाय शोधला. सगळ्यात आधी शेळके यांनी शेतात बोअर केली. शेततळ्यातून ठिंबकद्वारे रोपांना पाणी दिलं. याबरोबरच सेंद्रीय पद्धतीनं अर्थात शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खताची मात्र आणि योग्य नियोजन हेच शेळके यांचा सक्सेस मंत्र ठरला.

अशी सुचली कल्पना-

शेळके यांनी जेवण करताना वृत्तपत्रात अंजिर शेतीबाबत माहिती वाचली. शेतातील एक वेगळी वाट म्हणून शेळके यांनी अंजिराच्या शेतीकडे पाहिलं. पोलिस विभागात सेवा देताना शेळके यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवला. आता काळ्या आईची सेवा करण्याचा निर्धार आत्माराम शेळके यांनी बोलून दाखवला आहे. तरुणाईनं घरी बसून किंवा रिकामं फिरण्यात वेळ वाया न घालवता झिरो बजेटमध्ये आधुनिक शेती करावी, असा सल्ला शेळके यांनी दिला आहे. तर नागेश शेळके (आत्माराम शेळके यांचा मुलगा) सांगतो, वडिलांची अंजिर शेती करण्याची इच्छा होती. त्यानुसार पहिलाच प्रयोग अंजिरचा केला. त्यानुसार इस्राईल तंत्रज्ञानानुसार अर्थात आधुनिक शेती सेंद्रीय पद्धतीनं अंजिर शेती फुलवली.