Success Story: शेतकऱ्याच्या मुलाचा 'फोर्ब्सच्या' यादीत डंका; लोणार ते लंडन.. वाचा प्रेरणादायी प्रवास!
महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणारजवळील पिंपरी खंदारे या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या (Maharashra News) पोराने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे.

Success Story: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणारजवळील पिंपरी खंदारे या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या (Maharashra News) पोराने सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. राजू केंद्रे ( Raju Kendre) असे या तरुणाचे नाव असून तो चक्क फोर्ब्स इंडिया 2022 च्या (Forbes India 2022) ‘फोर्ब्स थर्टी अंडर थर्टी’ (Forbes 30 Under 30) यादीत झळकला आहे. राजूची लोणार ते लंडनपर्यंतची झेप राज्यातील नाही तर देशातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Also Read:
- Sharad Pawar Birthday : 82 वर्षांचे झाले शरद पवार, देशाच्या सर्वात प्रभावशाली नेत्याचा असा आहे राजकीय प्रवास!
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच! ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, NCPची खोचक टीका
- मोठी बातमी! सीमावाद पेटला असताना 100 हून जास्त गावांना नको झाला महाराष्ट्र, जाणून घ्या कारण...
राजू केंद्रे हा सध्या ब्रिटिश चिवनिंग स्कॉलरशीपवर लंडनमध्ये शिकत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये ‘भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता’ या विषयावर तो संशोधन करत आहे.
शिक्षणाचा कोणताही गंध नसलेल्या घरातील पहिलाच पदवीधर….
राजू हा शिक्षणाचा गंध नसलेल्या त्याच्या शेतकरी कुटुंबातील पहिला पदवीधर आहे. त्याचे 10 वी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. विशेष म्हणजे राजू ‘एकलव्य इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून वंचित, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करतो. आतापर्यंत त्याने 300 विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत केली आहे. त्याच्या याच सामाजिक कार्याची दाखल ‘फोर्ब्स इंडियाने’ घेतली.
अनपेक्षित! 🏆
पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याच हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या ‘Forbes 30 Under 30’ यादीत आलंय.आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात. pic.twitter.com/TUD6T30TX6
— Raju Kendre (@RajuKendree) February 7, 2022
लोणार ते लंडन.. प्रेरणादायी प्रवास
राजू केंद्रे याची लोणार ते लंडन प्रवास हा देशातील तळागाळातल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला, खेड्यातील मातीत वाढलेला हा तरुण केवळ स्वतः ची प्रगती करून थांबला नाही, तर आपल्यासारखे हजारो ‘राजू’ घडावे, यासाठी त्याचाही धडपड सुरु आहे. अशा या तरुणाच्या कर्तृत्वामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या