Suicide in Pune: सततच्या निर्बंधांमुळे नोकरी गमावलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

लॉकडॉऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, तर अनेकांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. घर आणि व्यवसाय सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.

Published: January 10, 2022 2:16 PM IST

By पी.संदीप | Edited by पी.संदीप

Mother Daughter Suicide

Suicide in Pune: ‘रोजी रोटी बंद होणार नाही. राज्यात लॉकडाऊन जाहीर होणार नाही, असे जाहीर करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असलाचे पाहता राज्यातील सार्वजनिक मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क, संग्रहालय, प्राणीसंग्रहालय बंद पुन्हा बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या कठोर निर्बंधामुळे नोकरी गमावल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलेले आहे. पुण्यातील केशवनगर मुंढवा येथे ही घटना घडली आहे. दत्ता पुशीलकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Also Read:

मिळालेली माहिती अशी की, दत्ता पुशीलकर हा पुण्यातील नांदे तलावात जीवरक्षक म्हणून काम करत होता. पण गेल्या लॉकडाऊनमध्ये जलतरण तलाव बंद झाले होते. त्यातच दत्ताची नोकरी गेली. 2020 पासून काम मिळत नसल्याने दत्ता नैराश्यात आला होता. त्यातच राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यालाच कंटाळून दत्ता पुशीलकर याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले, असा आरोप त्याच्या नातेवाईकांकडून होत आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची साथ आली आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडॉऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, तर अनेकांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. घर आणि व्यवसाय सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. आर्थिक घडी विस्कटल्याने अनेकांचे संसारही मोडले आहेत. तर बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेकांनी मृत्यूला कवळाले आहे.

दुसरीकडे, राज्यात कोरोनाचे संकट सलग दुसऱ्या वर्षी देखील गडद झाल्याचे दिसत आहे. गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध जाहीर केले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 2:16 PM IST