Phone Trapping Case: टेलिफोन टॅपिंग प्रकरण! पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल
Phone Trapping Case: पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Phone Trapping Case : पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Former Pune Police Commissioner Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग प्रकरण (Phone Trapping Case) रश्मी शुक्ला यांना चांगलेच भोवले आहे. टेलिफोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात आधीच न्यायालयात वाद (Dispute in court) सुरु आहे. असे असताना त्यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
Also Read:
राज्य गुप्त वार्ता विभागात (State Intelligence Department) आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात न्यायालयात वाद सुरु आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार समितीने राज्य सरकारला नुकताच अहवाल सादर केला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या रश्मी शुक्ला या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.
रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल करुन काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अॅक्टचा (Indian Telephone Act) गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर आरोप तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला होता. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुल्का यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या