मुंबई: देशात कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दररोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Coronavirus Third Wave) पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यात गौरी-गणपती आहे. गेल्या वर्षी देखील सणासुदीच्या काळातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.Also Read - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ! निकटवर्तीय सईद खानला अटक

आरोग्यमंत्री म्हणाले, सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कुठलाच विषय नाही आहे. मात्र, ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊन (Lockdown) किंवा कठोर निर्बंध (Restrictions)लावावे लागतील. याबाबत राज्य सरकारनं नोटिफिकेशनमध्ये आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तुर्तास कोणतेही कठोर निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहेत. Also Read - Health Department Recruitment Dates: तारीख ठरली! या दिवशी होणार आरोग्य विभाग भरती परीक्षा, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिस सज्ज, नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी सांगितली संभाव्य तारीख!

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून (Maharashtra Government) विविध उपाययोजना आखल्या जात आहे. अशामध्येच आता गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिसांनी यानिमित्ताने नियमावली जाहीर केली आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांनी जी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार जे नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येण्यार आहे. येत्या गुरुवारपासून मास्क (Mask) न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील (vishwas nangre patil) यांनी बुधवारी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conferance) बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जावी.’

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत पोलिसांची एकूण 13 विशेष पथकं तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असणार आहेत. मुंबईत एकूण 13 झोन असून प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. हे पथक झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवेल. भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची (Online darshan) सुविधा उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी (Mumbai police) गणेशोत्सव मंडळांना (Ganpat mandal) केले आहे.