मुंबई : एकीकडे लोकांना कोरोनाची लस (corona vaccine) मिळत नाहीये, तर दुसरीकडे ठाण्यात एकाच महिलेला एकाच वेळी तीन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर (Thane Municipal Anand Nagar vaccination Center) हा प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस (three doses of corona vaccine at one time) देण्यात आले. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून त्यांना पालिका डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, आरोग्य केंद्रावरील संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या बाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.Also Read - Maharashtra Corona Update: चिंता वाढली! राज्यात 4004 नवीन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आनंद नगर आरोग्य केंद्रावर 25 जून रोजी ब्राम्हड येथील महिला लस घेण्यासाठी गेली. यावेळी आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी संबंधीत महिलेला तीन वेळा लस दिल्याचे समोर आले होते. एकाच वेळी तीन डोस दिल्याने महिला घाबरली आणि घरी निघून गेली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला हा संपूर्ण प्रकार सांगितला. Also Read - Maharashtra COVID-19 Cases: सावधान! धोक्याची घंटा... मुंबईत Omicron व्हेरिएंटचे 99 टक्के रुग्ण

यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला याविषयी जाब विचारला मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि डाँक्टर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप पक्षाकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराला सत्ताधारी आणि पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. Also Read - Mumbai Corona updates: चिंता वाढली! ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, 4 रुग्ण आढळले

दरम्यान या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी एक समिती नेमली जाईल आणि चौकशी केली जाईल आणि संबंधितावर कारवाई केली जाईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. तसंच विरोधकांनी यावर राजकारण करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.