पुणे: देशासह राज्यावरील कोरोनाव्हायरसचं (Corona virus) संकट दूर झालेलं नसताना आणखी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, पुणे जिल्ह्यात (Pune District) डेल्टा प्लसचे (Delta Plus Variant) दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्थानिक आरोग्य प्रशासन (Health Department) सतर्क झालं आहे. दरम्यान, राज्यात झिका व्हायरसचा (zika virus) पहिला रुग्ण आढळला आहे. विशेष म्हणजे झिका व्हायरसचा पहिला रुग्ण (First Patient of Maharashtra) देखील पुणे जिल्ह्यातच सापडला आहे. पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला होता.Also Read - Mandir Kadhi Ughadnar: मंदिरात जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार, सरकारने जाहीर केली नियमावली!

मिळालेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील नीरा (Neera) येथे कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आढळून आला आहे. 14 वर्षांचा मुलगा आणि 40 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची बाधा झाली आहे. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन स्थानिक आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. Also Read - Mandir Kadhi Ughadnar: घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली होणार, अखेर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एकूण 25 व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी 14 वर्षांचा मुलगा आणि 40 वर्षांच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांना डेल्टा प्लस विषाणूची (Delta Plus Varient) लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालं असून रुग्णांच्या परिसरातील लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा का रद्द झाली?, आरोग्यमंत्र्यांनी कारण सांगत विद्यार्थ्यांची मागितली माफी!

झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला

पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा (zika virus) पहिला रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ‘एएनआय’च्या (ANI) वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये (Belsar Village) झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या या महिलेचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बेलसर गावातील या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे 30 जुलै 2021 रोजी तपासणी अहवालातून समोर आले. या महिलेला चिकनगुनिया (Chikungunya) देखील झाला होता. त्यामुळे हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. झिका व्हायरस हा आजार डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनिया आजाराप्रमाणे एडीस इजिप्ती या डासांमुळे पसरतो. यासाठी बाधित क्षेत्रांमध्ये डास अळी घनता सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले असून कीटकशास्त्र सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

काय आहे झिका व्हायरसचा इतिहास

झिका व्हायरस सर्वात आधी एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलामध्ये (Zika forest in Uganda) राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांमध्ये आढळला होता. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना (pregnant women) या विषाणूता संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकते. झिका व्हायरसच्या संसर्गामुळे ताप (Fever), सांधेदुखी (joint pain), शरीरावर चट्टे येणे (Scars on Body) अशा प्रकारची लक्षणं दिसतात. झिका व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.