Top Recommended Stories

Uddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...

Uddhav Thackeray Birthday: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: July 27, 2022 1:06 PM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

Uddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...
Uddhav Thackeray Birthday: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले...

Uddhav Thackeray Birthday: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) आज वाढदिवस आहे. ते आज 62 वर्षांचे झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आई जगदंबेचरणी केली आहे.

पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला

‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….’ असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र यामध्ये त्यांनी एक गोष्ट टाळली आहे. ती म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणे  टाळल्याचे पाहायला मिळत आहे. आता हा उल्लेख टाळण्यामागे अनेक कारणे आहेत. याच्याच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

You may like to read

पाहा ट्वीट

राज्यात सत्तासंघर्ष सुरुच

सध्या राज्यामध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षामध्ये ऐतिहासिक फूट पडली आहे. शिंदे आणि ठाकरे अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली आहे. अशा वेळी सध्या खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले आणि शिवसेनेत आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड झाले. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya thackeray) हे मैदानात उतरले आहे. त्यांच्याकडून सतत बंडखोरांवर जोरदार टीका केली जातेय. या टिकांना बंडखोर आमदारांकडूनही प्रत्युत्तर दिले जातेय.

यासोबतच आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहे. ते सातत्याने बंडखोरांवर निशाणा साधत आहेत. हा संघर्ष सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>