By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे यांनी ठाकरी स्टाईलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोरांवर डागली तोफ....
Uddhav Thackeray Interview: शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Udhav Thackeray) यांच्या रोखठोक मुलाखतीचा पहिला भाग 26 जुलैला प्रदर्शित झाला. मुलाखतीचा दुसरा भाग बुधवारी (27 जुलैला) प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ही मुलाखत घेतला आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) आणि बंडखोरांवर ठाकरी शैलीत तोफ डागली आहे.

Uddhav Thackery Interview : गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी त्सुनामी (Maharashtra Political Crisis) येऊन गेली. या त्सुनामीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) कोसळलं. विशेषत: शिवसेनेतील अंतर्गत कलह बंडाळीच्या (Shiv Sena Crisis) रुपात चव्हाट्यावर आला आणि त्यात शिवसेनेचीच मोठी हानी झाल्याचे पाहायला मिळालं. या सगळ्या अभूतपूर्वी घडामोडीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून रोखठोक बाजू मांडली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या बंडखोर आमदार आणि खासदारावर घणाघाती टिकास्त्र सोडले. शिवसेनेने तुम्हाला काय नाही दिलं, आता बंडखोरांनी त्यांच्या बापाचा फोटो लावून जनतेसमोर मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा म्हणजे हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतांची भीक मागू नये, असे देखील उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना बजावलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दांचा देखील प्रयोग केला. शिवसेनेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी पाठीत खंजीर खुपला अस सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना उद्देशून तुम्ही मर्द नाहीत नामर्द आहात. विश्वासघातकी आहात. पालापाचोळा आहात, असे संबोधले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आम्ही हिंदूत्त्व शिकवलं आता ते आम्ही हिंदुत्त्व सोडलं, अशी आवई उठवत आहेत. बोंबा मारत फिरत आहेत. 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. तेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. शिवसेना संपेल, अशा अनेकांचा झाला होता. मात्र, शिवसेनेने ‘एकला चलो रे’म्हणत एकाकी झुंज दिली आणि 63 आमदर निवडणून आणले. आता माझे वडील का चोरतात? याचा अर्थ असा की, तुमच्यात कर्तृत्त्व नाही, हिंमत नाही, तुम्ही नामर्द आहात. तुम्ही जनतेचा विश्वासघात करत आहात. मग बाळासाहेबाबद्दल संभ्रम का निर्माण करतात. स्वत:च्या बापाचा फोटो लावून जनतेसमोर मतांची भीक मागा, तेव्हा बघू ते तुम्हा भीक घालता का ते.
Trending Now
त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेसोबत ठरवलं होतं अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद. आता देखील त्यांनी तेच केलं. तेव्हा जे ठरलेलं होतं ते केलं असतं तर भाजपला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, पण ही जे काही सोंगं ढोगं करत आहे. कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे, पण जनतेला जास्त दिवस मूर्ख बनवता येत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.
ठाणेकर सुज्ञ आहेत. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, हे अतुट नातं आहे. या पालापाचोळ्यांना ते तोडता येणार नाही, ठाणेकर आता फक्त निवडणुकीची वाट पाहात आहेत. हा जो पालापाचोळा आहे तो म्हणजे ठाणेकर नव्हेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दीक वार केला.
आम्हाला पुरावे द्यायची आवशक्यता नाही. जनता म्हणते, निवडणूक येऊ द्या, त्यांना आम्ही पुरून टाकतो. समजात त्यावेळी मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, परंतु पुढे जाऊन त्यांनी आणखी काही मागितलं असतं. कारण त्यांची भूक भागतच नाहीय. आता ते मुख्यमंत्री झाले आहेत. पण आता त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांसोबत ते स्वतःचीच तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, याला हावरटपणा म्हणतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
ज्यांना शिवसेनेने जन्म दिला. मोठं केलं राजकारणातही आणलं आणि आता ते त्या आईलाच गिळायला निघाले, अशी अवलाद आहे ही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही नामर्द आहात, शिवसेनेला गिळण्या इतपत तुमच्यात ताकद नाही, असे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सह बंडखोरांना सुनावले आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या