Top Recommended Stories

Maharashtra Unseasonal Rainfall : राज्यावर अवकाळी पावासाचे सावट, कोकणासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पडणार पाऊस!

Maharashtra Unseasonal Rainfall : अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

Published: January 21, 2022 1:58 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Rain alert in maharashtra
Rain alert in maharashtra

Maharashtra Unseasonal Rainfall: राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे ( Unseasonal Rainfall) सावट आहे. त्यामुळे बळीराजा (Farmer) पुन्हा एकदा संकटात आला आहे. कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्राला (Central Maharashtra) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

Also Read:

हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर (Deputy Director General of Meteorology Krishnananda Hosalikar) sयांनी सांगितले की, ‘उत्तर भारतात पश्चिमी प्रक्षोभ जाणवत असून त्यामुळे वायव्य भारतात म्हणजेच राजस्थानजवळ सिस्टिम तयार झाली आहे. त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्राकडून येणारे आद्रतायुक्त वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. कोकण (Kokan), गोवा (Goa) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) शनिवारी आणि रविवारी काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी हलक्या पवासाची शक्यता आहे आणि पाऊस झाला तरी सुद्धा तो हलक्या स्वरापाचा असेल.’

You may like to read

– 22 जानेवारी रोजी पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar), पुणे (Pune) या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका किंवा ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

– 23 जानेवारी रोजी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पुणे (Pune), भंडारा (Bhandara), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात (Marathwada) हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 21, 2022 1:58 PM IST