Top Recommended Stories

Wari 2022 : वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडून चोरटा फरार, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Wari 2022 : विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहेत. अशामध्ये वारीतील गर्दीचा फायदा घेत चोरांचा सुळसुळाट खूप वाढला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Published: June 26, 2022 9:10 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Wari Video
Wari Video

Wari 2022 : संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. कोरोना महामारीनंतरचा हा पहिलाच पालखी सोहळा (Palkhi Sohala) असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने वारकरी वाारीमध्ये सहभागी झाले आहेत. वारीमध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे वारकऱ्यांचे मंगळसूत्र, गळ्यातील साखळी, मंगळसुत्र, पाकिटांची चोरी करत आहेत. अशामध्ये वारीमध्ये सहभागी झालेल्या एका वारकऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहेत. अशामध्ये वारीतील गर्दीचा फायदा घेत चोरांचा सुळसुळाट खूप वाढला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटा एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करतो.

You may like to read

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निळा कुर्ता घातलेली एक व्यक्ती इतरांप्रमाणे पालखीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी आहे. अशामध्ये पालखीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून टोपीवाला एक तरुण उभा राहतो. पालखी जशी जवळ येते तशी गर्दी वाढत जाते. याच गर्दीचा फायदा घेत हा चोरटा त्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचण्याचा प्रयत्न करतो पण साखळी निघत नसल्यामुळे हा चोरटा चक्क दाताने सोन्याची साखळी तोडतो आणि तिथून निघून जातो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशामध्ये वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवावे, मोबाईल, गळ्यातील सोन्याच्या वस्तू त्याचप्रमाणे पाकीट सांभाळून ठेवावे आणि चोरट्यांपासून सावध रहावे असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, देहू, आळंदी परिसरात पालखी सोहळ्यासाठी आलेल्या 225 संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यापैकी, 60 जणांविरोधात गुन्हे दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली. या आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>