मुंबई: एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानं राज्यात जिल्हा परिषद (District council) आणि पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) पोटनिवडणुकांच्या (By election) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Commissioner U P S Madan) यांनी सोमवारी केली.Also Read - शिर्डी साईबाबा मंदिरात मोठी कारवाई! प्रशासकीय अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक

राज्यातील एकूण 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरला मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 सप्टेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक या आधी सुप्रीम कोर्टानं कोरोनामुळे पोटनिवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. Also Read - Breaking News Live Updates: कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत; सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील अकोला, वाशिम आणि उपराजधानी नागपूर या जिल्हा परिषदांसाठी या पोटनिवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान पार पडणार आहे. Also Read - Raj Kundra ची ऑर्थर रोड जेलमधून सूटका, 119 Porn Videos सापडल्याचा क्राईम ब्रँचचा खुलासा

या 5 जिल्हा परिषद आणि त्या जिल्ह्यांमधील पंचायत समित्यांसाठीच्या रिक्त जागांसाठी मतदान 19 जुलैला होणार होतं. मात्र, 9 जुलैला सुप्रीम कोर्टानं ही निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारनं कोरोनामुळे पोटनिवडणुका स्थगित कराव्यात, अशी विनंती केली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं 9 जुलैला निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

सरकारासह विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष!

ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) तिढा सुटेपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीनं घेतली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेतली आहे. आता सर्व राजकीय पक्षांशी बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील, असं काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांनी सांगितलं आहे. त्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण टिकवण्यासाठी काही उपाय सुचवले होते. त्याची अंमलबजावणी तातडीने केली गेली असती तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.