मुंबई: राज्यातीस 85 जिल्हा परिषदा आणि 144 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची (ZP Election Result 2021) मतमोजणी सुरू आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या 229 जागांसाठी राज्यात सहा जिल्हा परिषदात पोटनिवडणूक झाली. (Maharashtra latest news) नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार, पालघर या सहा जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी मतदान झालं होतं.Also Read - ZP Election 2021: शिवसेनेला मोठा धक्का! पालघरमध्ये खासदार पुत्राचा पराभव

राज्यातील सहा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. धुळे जिल्ह्यात भाजपनं पुन्हा आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल (BJP Leader Jaikumar Rawal) यांनी पुन्हा शिंदखेडा तालुक्यात (Shindkheda) आपले वर्चस्व कायम राखण्यास यश मिळवले आहे. लामकानी जिल्हा परिषद गटातून गुजरातचे भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader C.R.Patil) यांची कन्या धरती देवरे (Dharati Devare) या विजयी झाल्या आहेत. (Dhule Zilla Parishad Election) Also Read - BMC Election 2022: महत्वाची बातमी! मतदार यादीत फोटो नसेल तर मतदाराचे नाव वगळणार, 8 जुलैच्या आधी करुन घ्या हे काम!


जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल 2021

जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर निकाल जाहीर एकूण जागा

अकोला

1 1 2 1 9 14 14

वाशिम

2 1 5 2 4 14 14

नागपूर

3 0 2 9 2 16 16

नंदूरबार

4 3 1 3 0 11 11

धुळे

8 2 3 2 0 15 15

पालघर

5 5 4 0 1 15 15

एकूण

23

12

17

17

16

85

85

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता…

सध्या धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. 56 पैकी 27 जागा भाजपकडे आहेत. शिवसेना 2, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेसकडे 6 जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे. Also Read - Pankaja Munde in Action: ...तर निवडणुका होऊ देणार नाही, पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

लामकानी गावातील भाजपच्या उमेदवार धरती देवरे सुमारे 4 हजार 96 मतांनी विजयी झाल्यात. धरती या गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (आर.सी.पाटील) यांच्या कन्या आहेत. धुळ्यात भाजपला बहुमतासाठी 14 पैकी दोन जागांची गरज होती. या ठिकाणी जिल्हापरिषद 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदन झालं होतं.

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 पैकी 13 जागांचे निकाल हाती

वंचित बहुजन आघाडीला बहुमत

वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
प्रहार : 01

Live Updates

 • 2:26 PM IST
  राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. तर काँग्रेसनं देखील मुसंडी मारली आहे. नगरखेडा पंचायत समिती आणि पारडसिंग जिल्हा परिषद या दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत आधी येथे राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. उर्वरित विदर्भात मात्र, काँग्रेसची मुसंडी मारल्याचं चित्र आहे. नागपूरमधल्या डोंगरगाव पंचायत समितीत काँग्रेसच्या उज्वला खडसे विजयी झाल्या आहेत.
 • 1:14 PM IST
  धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं राखला गड, काँग्रेसचा धुव्वा
  – भाजप – 5
  – काँग्रेस – 00
  – राष्ट्रवादी काँग्रेस – 02
  – शिवसेना – 01
 • 1:13 PM IST
  वाशिममध्ये राष्ट्रवादीची सरशी
  जिल्हा परिषद 14-14
  भाजप-02
  शिवसेना-01
  राष्ट्रवादी-05
  काँग्रेस-02
  वंचित – 02
  इतर-02
 • 1:09 PM IST
  नागपूर:
  गुमथळा सर्कलमधून अनिल निधान पहिल्या फेरीत मागे, अनिल निधान भाजपचे
  दवलामेटी पंचायत समिती मध्ये भाजपच्या ममता जैस्वाल विजयी
 • 1:09 PM IST
  जिल्हा परिषद शिवसेना एका जागेवर विजयी
  शिवसेनेच्या उमेदवार विनया विकास पाटील 6200 मतांनी विजयी
  नंदुरबार म्हसावद गटात काँग्रेसच्या हेमलता शितोळे 2924 मतांनी विजयी
 • 1:06 PM IST
  अक्कलकुवा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार विजयी
  नंदुरबार काँग्रेस उमेदवार रेहाणाबेन मक्रणी विजयी
  कापडणे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण गुलाबराव पाटील आघाडीवर
  भाजपचे उमेदवार रामकृष्ण खलाने कट्टर विरोधक

 • 1:05 PM IST
  अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
  निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

  1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
  2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
  3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
  4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
  5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
  6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
  7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
  8) बपोरी : माया कावरे : भाजप
  9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
  10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
  11) दगडपारवा : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी
  12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस
  13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार

  एकूण जागा : 14
  निकाल जाहीर : 13

  वंचित : 05
  अपक्ष : 02
  शिवसेना : 01
  राष्ट्रवादी : 02
  भाजप : 01
  काँग्रेस : 01
  प्रहार : 01