आम्ही अंधश्रद्धेचे मुळीच समर्थन करत नाही. पण, समाजाता काही गोष्टींबाबत उगाच समज प्रचलीत असतात. काही लोक तर, काही घटनांचा संदर्भ संकेताशी जोडतात आणि भविष्यवाणी व्यक्त करतात. म्हणून काही समजांची चर्चा करावी लागते. त्याचा वास्तवतेशी आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास सत्याशी संबंध असतोच असे नाही. उदाहरणच घ्यायचे तर, कुत्र्याचेच घ्या ना. कुत्रा हा तसा पाळीव प्राणी. काहींच्या घरात राहतो तर, काहीच्या घराबाहेरही अनेक बेवारस कुत्रे भटकत असतात. या कुत्र्यांबाबतही काहींना असेच गैरसमज असतात. जसे की, घरासमोर कुत्रा रडला की काहीतरी अशूभ घडते.

घरासमोर कुत्रा रडला की, अशूभ घडते हा एक फार पुर्वीपासून चालत आलेला एक समज आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी याला दुजोराच देतात. प्राचीन पुराणातही या अनुशंगाने संदर्भ आढळतात. ज्योतिष्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार बोलायचे तर म्हणे घरासमोर कुत्रा रडला की, घरावर संकट येते आणि नैसर्गिक आपत्ती येऊन घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.

शास्त्रामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याबद्धलही सांगितले आहे. जसे की कुत्र्याचे बेसूर भूंकने हे अपशकूणी असते. तुम्ही जर शुभ कार्यासाठी निघाला असाल आण कुत्र्याने जर आपला मार्ग अडवला तर, तुमचे कार्य सिद्धीस जात नाही, असाही एक समज अनेकांच्या मनात नेहमीच पहायला मिळतो. तसेच, घरातल्या पाळीव कुत्र्याने जर आश्रू ढाळले तर, घरावर संकट येण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमच्या घरातून काही कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि चिखलात माखलेला कुत्रा जर तुमच्या नजरेस पडला तसेच, त्याने जर आपले कान फडफडवले तर तुमचे कार्य सिद्धीस जात नाही. म्हणूनच त्या कामावर निघालेल्या व्यक्तीने ते काम उद्यावर ढकललेले केव्हाही चांगले असेही काही महाभाग मानतात. (हेही वाचा, कुत्र्याला ठोठावली फाशीची शिक्षा; पाकिस्तानातील कोर्टाची अजब शिक्षा)

दरम्यान, वरील सर्व कुत्र्याचे नकारात्मक मुद्दे असले तरी, घरात कुत्रा असण्याचे काही महत्त्वाचे फायदेही आहेत. त्यापैकी ज्यौतिष्यांनी सांगितलेला एक असा की, जर कोणी व्यक्ती नियमीतपणे कुत्र्याला भोजन देत असेल तर त्याला त्याच्या शत्रूपासून भय बाळगण्याचे कारण नाही. कुत्रा पाळल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते असेही सांगितले जाते. तसे, घरात कोणी आजारी असेल तर, घरातला कुत्रा तो आजार आपल्या खांद्यावर घेतो असेही म्हणतात.

ज्योतीष शास्त्रात तर कुत्रा पाळल्याने संतती प्राप्ती होते असाही दावा करण्यात आला आहे. घरात काळा कुत्रा पाळल्यास संतती प्राप्ती लवकर होते असे ज्योतिष शास्त्राचे म्हणने. काही ठिकाणी कुत्र्याला गृहाचेही प्रतिक मानले जाते. जसे की, कोणी घरात कुत्रा पाळत असेल तर, त्या व्यक्तीवरील राहूचा प्रभाव कमी होतो. कुत्र्याची सेवा केल्यानेही राहुचा प्रभाव कमी होतो. पितृपंधरवड्यात कुत्र्याला गोड भाकरी देण्यास सांगितली जाते.(हेही वाचा, कुत्र्याने मारली मालकीनीला गोळी)

थोडक्यात महत्त्वाचे: आम्ही कोणत्याही अंदश्रद्धेचे समर्थन करत नाही हे सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बातमीत व्यक्त केलेल्या दाव्यांशी इंडिया डॉट कॉम सहमत असेलच असे नाही. वाचकांनी वरील मजकूर केवळ माहिती म्हणून वाचावा. त्याचा वास्तवाशी काही संबंध असेलच आसे नाही.