इस्लामाबाद : पादण्यावर कोणाचं नियंत्रण असत का ?  तुम्ही ठरवून तुमच पादण रोखू शकता का  ?  तेच पादण ज्याला सभ्य भाषेत फॅर्टिंग म्हटल जातं. तस तर यावर कोणाचा कंट्रोल नसतो. पाकिस्तानात एकाला पादण्याची शिक्षा म्हणून मृत्यूदंड दिल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

पाकिस्तानात रमजानच्या महिन्यात एका इसमाला मस्जिदमध्ये पादणे महागात पडले असे वृत्त सगळीकडे वायरल झाले आहे.  या पादण्याचे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचले तेव्हा या इसमाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली असेही यात सांगण्यात आले होते. पण यात कोणतेही तथ्य नाही.  आरोपीसाठी  त्याला मृत्यू निवडण्याचे दोन पर्याय दिले आहेत. यातला त्याला जो सोप्पा वाटेल त्याने तो निवडण्याचे अधिकार दिले आहेत असेही त्यात म्हटले गेले होते. (पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरला आग, 123 नागरिकांचा होरपळून मृत्यू)

यामागची सत्य बाजु अशी आहे की, एकामागोमाग एक अनेक प्रतिष्ठित वेबसाईट आणि न्यूज चॅनलवर हे वृत्त रंगवून सांगण्यात आले. त्यांच्या या वृत्तानुसार  इस्लामाबाद हेराल्डच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी न्यायाधिशाने मोहम्मद अल वहाबी नामक इसमाला रमजानच्या महिन्यात मस्जिदमध्ये पादण्याल्याने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. अल वहाबीवर आरोप आहे की, त्याने पाकिस्तानच्या वेगवेगळ्या 6 मस्जिदमध्ये एकूण 17 वेळा पादला होता. ज्यामुळे त्याला मस्जिदमधून बाहेर करण्यात आले होते. त्याच्या या हरकतीमुळे इतकांच्या इबादतमध्ये अडचण निर्माण झाली होती. पण अशाप्रकारची कोणतीही घटना पाकिस्तानात घडली नव्हती.

33 वर्षाच्या मोहम्मद अल वहाबीने आपल्या बचावासाठी सांगितले की, तो क्रोनिक फ्लूटून्स या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. पण त्याची बाजू घेण्यासाठी पाकिस्तानात कोणताही वकिल तयार होत नाहीए . कारण जो या आरोपीची बाजू घेईल त्यालाही दोषी मानले जाते व तो शिक्षेस पात्र असतो असे मानले जात असल्याचे इथले जाणकार सांगतात. त्यामुळे वकिलांनी त्यांची केस लढण्यास नकार दिल्यााची कहाणीही सोशल मीडियावर रंगविण्यात आली होती.