सोमवारी म्हणजे ७ ऑगस्ट रोजी जगभरात रक्षाबंधन हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. आतापासून आपल्याला बाजारात रंगीबेरंगी राख्या पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बहिणींसाठी आकर्षक गिफ्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बरोबरच हल्ली ट्रेंड आहे तो सोशल मीडियाचा. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर आपल्या बहिणीने किंवा भावाने मॅसेज पाठवण्याचा हल्ली ट्रेंड आहे. यासाठी बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला जे स्पेशल मॅसेज पाठवायचे ते खाली दिले आहेत…

01

 नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

02

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती…
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षाचे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती
बंधन असुनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…

03

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहिण-भावाचा पवित्र सण….

04

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ…
माझ्या जीवनाचा हरेक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव अरलेला असेल….

05

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे….
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…..

06

 राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

07

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस

08

राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा