नवी दिल्ली : या जगात कशाकशा प्रकारचे लोक राहतात हे सांगता येत नाही. म्हणूनच कदाचीत व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले असावे. तुम्हाला जर कोणी उपाशी राह म्हटले तर, तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता? एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, फार फार तर मन मारून तुम्ही एक आठवडा राहू उपाशी राहू शकाल. तेही कसेबसे. पण, त्यापूढे हा कालावधी वाढवायचा तर मात्र, तुम्हाला जगणे कठीण होऊन बसेन. पण, इथे एका महिलेबाबतचा भलताच प्रकार पूढे आला आहे. या महिलेने गेली 60 वर्षे चक्क काहीही खाल्ले नाही. विशेष म्हणजे इतके करून ही महिला चक्क जिवंत आहे. आता बोला.

या महिलेचे नाव सरस्वतीदेवी असे असून, ती ७५ वर्षांची आहे. ही महिला केवळ चहा आणि पाण्यावरच जगते असे सांगतात. या महिलेचा विवाह झाल्यावर ती जेव्हा पहिल्यांदा बाळंत झाली तेव्ही तिला टाईफाईड झाला. दरम्यान, तिने काहीही खाल्ले की तिला उलटी येत असे. तिने अनेक उपाय करून पाहिले मात्र तिचा त्रास कमी झाला नाही. त्यानंतर तिने केवळ मजबूरीने अन्न खाणे सोडून दिले. आता ती केवळ चहा आणि पाणीच पीते.

दरम्यान, आता तिला पाच मुले असून, तिला जेवणाबाबत विचारले असता ती हसून नकार देते. पंजाब केसरी या वृत्तपत्राने याबाबत वृत दिले आहे. मात्र, वृत्तात ही महिला नेमकी कुठली आहे, याबाबत उल्लेख नाही.