1983 World Cup: आजच्या दिवशीच भारताने रचला होता इतिहास, कपिल देव बनले होते विश्वचषक जिंकणारे सर्वात तरुण कर्णधार
1983 World Cup: 1983 मध्ये आजच्या दिवशीच भारताने पहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपद मिळवून सर्वांनाच चकित केले होते. याशिवाय या विश्वचषकात त्यांच्या नावावर एका विक्रमाची देखील नोंद झाली होती.

1983 World Cup: कोणताही भारतीय क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकणार नाही. कारण या दिवशी भारत प्रथमच विश्वविजेता (1983 World Cup) बनला. 25 जून 1983 हा तो ऐतिहासिक दिवस (Historic Day) होता, जेव्हा भारताने क्रिकेट जगतातील सर्वात दिग्गज वेस्ट इंडिज संघाचा (West Indies) पराभव करून मोठा इतिहास रचला होता. एकीकडे वेस्ट इंडिजच्या नजरा तिसर्या विजेतेपदावर होत्या, तर दुसरीकडे संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाला (Indian Team) सुरुवातीपासून कमी लेखले गेले होते. मात्र कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जेतेपद पटकावून (World Champion India) अवघ्या जगाला चकित केले होते. एकीकडे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला, तर दुसरीकडे कपिल देव विश्वचषक जिंकणारे सर्वात तरुण कर्णधारही (Youngest World Cup Winning Captain ) ठरले.
Also Read:
🗓️ #OnThisDay in 1983
A historic day & a landmark moment for Indian cricket as #TeamIndia, led by @therealkapildev, clinched the World Cup title. 🏆 👏 pic.twitter.com/WlqB0DQp1U
— BCCI (@BCCI) June 25, 2022
भारताने विजयासाठी ठेवले होते 184 धावांचे लक्ष्य
लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव 54.4 षटकांत 183 धावांवर आटोपला. खराब सुरुवातीनंतर श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी संघाची धुरा सांभाळली. श्रीकांतने 57 चेंडूत 38 धावा केल्या, तर मोहिंदर अमरनाथने 26 धावा केल्या. याशिवाय संदीप पाटीलने संघाच्या खात्यात 27 धावांचे योगदान दिले. विरोधी संघाकडून अँडी रॉबर्ट्सने ३ बळी घेतले.
वेस्ट इंडिजची खराब सुरुवात
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 5 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर डेसमंड हेन्स (13) आणि व्हिव्हियन रिचर्ड्स (33) यांनी दुस-या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली, पण ते बाद होताच संघाची कोंडी झाली. विरोधी संघाला घाम फोडणारा वेस्ट इंडिज संघ या मत्त्वाच्या सामन्यात पूर्णपणे दडपणाखाली होता. 76 धावांपर्यंत संघाने 6 विकेट गमावल्या होत्या. इथून भारताचा विजय जवळ दिसू लागला.
लाला-मोहिंदरने घेतल्या 6 विकेट
अखेर विंडीजचा संघ 52 षटकांत 140 धावांवर गारद झाला. या सामन्यात भारताकडून मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर बलविंदर संधूने 2 आणि कपिल देव-रॉजर बिन्नी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला होता.