तिरूवंतपुरू: क्रिकेटपटू श्रीसंतला केरळ उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने श्रीसंतवरील बंदी हटविण्याचे आदेश बीसीसीआयला दिले आहेत. 2013मध्ये मॅच फिक्सिंग केल्या प्रकरणी बीसीसआयने श्रीसंतवर आजन्म बंदी घातली होती.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचे इतर दोन खेळाडू अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांना सुद्धा मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळले होते. या स्पॉट फिक्सिंगची तेव्हा क्रिकेट विश्वात तसेच, देशभरात मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसआयने राजस्थान रॉयल संघावरही आयपीएलसाठी पाच वर्षांची बंधी घालण्यात आली होती. 2018 च्या आयपपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स पुनरागमन करणार आहे.

दरम्यान, न्यायालयाने निर्दोश मुक्तता केली असली तरी बीसीसीआयने मात्र श्रीसंतवरील बंदी कायम ठेवली आहे. याविरोधात त्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता कोर्टानेच बीसीसीआयला बंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीसीसीआय काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.