मुंबई : आयपीएलमध्ये (IPL2021) सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ यंदाच्या सीझनमध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी देखईल धडपड करत आहे. यंदाच्या आयपीएलचा (IPL) दुसरा हंगाम सुरू झाल्यानंतर मुंबईला (MI) सलग तीन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. मुंबई संघ सध्या आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मात्र आता परिस्थिती निर्माण झाली आहे की मुंबई इंडियन्स प्लेऑफ (playoffs) गाठू शकते का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Can Mumbai Indians reach the IPL 2021 playoffs? Find out the possibilities)Also Read - MS Dhoni पुढील हंगामात CSK सोडणार का? वाचा कॅप्टन कूलने काय दिले उत्तर

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम म्हणजे रोहित शर्माची (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या 14व्या सीझनमध्ये संघातील काही खेळाडूंना फॉर्म गवसत नसल्याने संघाची वाताहत झाली आहे. दुसरा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबई इंडियन्सला एकही विजय नोंदवता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स यंदा जेतेपदाची हॅट्रिक मारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांना संघ प्लेऑफ (IPL 2021 Playoffs) तरी गाठू शकेल का असा प्रश्न पडला आहे. Also Read - DC vs KKR Head to Head : आकडे सांगतात कोलकाता दिल्लीसमोर वरचड; जाणून घ्या दोन्ही संघांची समोरासमोर कामगिरी

रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challenger Bangalore) विरुद्ध पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्स टीम पॉईंट्स टेबलमध्ये (Points table) शेवटून दुसऱ्या म्हणजेच सातव्या क्रमांकावर खाली गेली आहे. मुंबईने आतापर्यंत 10 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत तर 6 सामन्यांमध्ये संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. मुंबई संघ सध्या 8 पॉईंट्स आणि -0.551 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. मात्र मुंबईकडे प्लेऑफ फेरी (Playoff Round) गाठण्याची संधी अजून कायम आहे. मुंबईचे आणखी 4 सामने बाकी आहेत. या चारही सामन्यांत मुंबईला विजय मिळवता आला तर मुंबईचे 16 पॉईंट्स होतील आणि मुंबईची प्ले ऑफमधील जागा पक्की होईल. मात्र यापैकी एकही सामना गमावला तर मुंबईला इतर संघांच्या पॉइंट्सवर आणि नेट रनरेटवर अवलंबून रहावे लागू शकते. Also Read - आरसीबीसाठी Virat Kohli च्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीचा पराभवाने शेवट, आकड्यांमध्ये पाहा कशी राहिली कामगिरी

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन्ही संघांनी प्लेऑफमधील जागा जवळपास पक्की केली आहे. या दोन्ही संघांकडे प्रत्येकी 16-16 पॉईंट्स आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) प्ले ऑफच्या आशा मावळल्या आहेत. आता उर्वरीत दोन जागांसाठी पाच संघांमध्ये टक्कर होणार त्यामध्ये मुंबई इंडियन्ससह पंजाब किंग्ज (Punjab Kings), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि आरसीबी (RCB) या संघांचा समावेश असून सर्व संघांचे 10-10 सामने झाले आहेत. यात आरसीबीने 6 विजयासह 12 पॉइंट मिळवले आहेत. तर इतर चारही संघांकडे 6 पराभव आणि 4 विजयासह 8 पॉइंट आहेत.

मुंबई इंडियन्सचे पुढचे चार सामने हे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यासोबत होणार आहेत. हे चारही सामने मुंबईला जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुंबईसाठी प्रत्येक सामना हा आता ‘करो या मरो’ या परिस्थितीचा असणार आहे. (Can Mumbai Indians reach the IPL 2021 playoffs? Find out the possibilities)