टोकियो ऑलिम्पिकवरील (Tokyo Olympic) कोरोनाचे (Corona virus) संकट आणखी दाट होत चालले आहे. ऑलिम्पिकशी (olympics) संबंधित असलेल्या आणखी 19 जणांचा कोरोना रिपोट पॉझिटिव्ह (Report Corona Positive) आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकशी संबंधित असणाऱ्यांना कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या 106 वर पोहचली आहे. चेक गणराज्यचा चौथा खेळाडू रोड सायकलिस्ट मिशेल श्लेजेलचा कोरोना रिपोट पॉझिटिव्ह आला आहे.Also Read - RJ Malishka Dance Video: नीरज चोप्राची मुलाखत घेताना मलिष्किने केला डान्स, नेटकरी करत आहेत ट्रोल!

आयोजकांनी (Tokyo Olympic organizers) रोज जारी करण्यात येणाऱ्या कोरोना अपडेट्सबद्दल (Corona update) सांगितले की, ‘3 खेळाडू, खेळाशी संबंधित 10 कर्मचारी, 3 पत्रकार आणि 3 कंत्राटदारांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑलम्पिकशी संबंधित कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत आकडा 106 वर पोहचला आहे. यामध्ये 11 खेळाडूंचा समावेश आहे. तसंच चेक गणराज्यच्या टीममध्ये आतापर्यंत 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. Also Read - Tokyo Olympics: दीपक पुनियाच्या कोचने रेफरीवर केला हल्ला, ऑलिम्पिक व्हिलेज तात्काळ सोडण्याचे आदेश

राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (National Olympic Committee) सांगितले की, ‘चेक गणराज्य टीमचा सहावा सदस्य आणि चौथा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. यामध्ये रोड सायकलिस्ट मिशेल श्लेजेल याचा समावेश आहे. त्याला शनिवारी रोड रेसमध्ये सहभागी व्हायचे होते पण आता तो सहभागी होऊ शकणार नाही. याआधी चेक गणराज्यचे दोन वॉलीबॉल पटू आणि एक टेबल टेनिसपटू पॉझिटिव्ह आले होते. चेक टीमचा डॉक्टर देखील गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. यापूर्वी एका वॉलिबॉल कोचला देखील कोरोनाची लागण झाली होती. Also Read - Tokyo Olympics 2020: भारताचं Gold Medal थोडक्यात हुकलं, Ravi Kumar Dahiya पटकावलं Silver!

दरम्यान, अन्य देशांबद्दल सांगायचे झाले तर, चिलीतील एक ताइक्वांदो खेळाडू, नेदरलँडचा स्केटबोर्ड खेळाडू आणि तायक्वांदोपटूला कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण अफ्रीकेचे दोन फुटबॉलपटू आणि अमेरिकेचा एक वॉलिबॉलपटूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.