नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. हरभजन सिंगला पुत्ररत्न (Harbhajan-Geeta Baby) झाले आहे. हरभजन सिंगची पत्नी गीता बसराने 10 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. त्याने स्वत: ट्वीट (Tweet) करत ही गोड बातमी दिली. टीम इंडियाच्या खेळाडूंसह हरभजन आणि गीताच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.Also Read - Raj Kundra Pornography Case: सततच्या आरोपांवरुन शिल्पा शेट्टी त्रस्त, पहिल्यांदाच ट्विटर पोस्ट करत दिली सविस्तर दिली प्रतिक्रिया

Also Read - Priyanka Chopra Selfiemode: 'देसी गर्ल' सेल्फी मोडमध्ये, पत्नीचा हॉटनेस पाहून निक जोनस क्लिन बोल्ड!

हरभजन सिंगने ट्वीट करत असे लिहिले आहे की ‘आम्हाला खूप खास आणि सुंदर भेट मिळाली आहे. आम्ही मनापासून आनंदी आहोत. आमचं आयुष्य आता पूर्ण झालं आहे. देवाने आम्हाला मुलाच्या रुपाने आशीर्वाद दिला असून त्या बद्दल मी त्याचे आभार मानतो. गीता आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला आमच्या हितचिंतकाकडून सतत प्रेम आणि पाठिंबा मिळाला. त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.’ Also Read - Taapsee Pannu Birthday Special: अभिनेत्री होण्याआधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती तापसी पन्नू, असा राहिला तिचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास!

हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी 29 ऑक्टोबर 2015 मध्ये लग्न केले. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर (Harbhajan-Geeta Love Story) दोघे विवाहबंधनात अडकले. 2016 मध्ये त्यांच्या घरी मुलीचे आगमन झाले होते. त्यांची मुलगी 5 वर्षांची असून तिचे नाव हिनाया आहे. आता दुसऱ्यादा आई-बाबा झाल्यामुळे दोघेही खूप आनंदीत आहेत. दरम्यान, गीता बसराने 2006 मध्ये इम्रान हश्मीच्या ‘दिल दिया है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘वो अजनबी’ गाण्यात हरभजनने तिला पाहिले होते आणि त्याला ती आवडली. युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) मदतीने त्याने गीताचा नंबर मिळवला. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.