Top Recommended Stories

Virat Kohli पुन्हा अडचणीत! राष्ट्रगीत सुरु असताना केला लाजिरवाणा प्रकार, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Virat Kohli Trolled: विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर नेटीझन्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

Updated: January 24, 2022 8:01 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Virat Kohli @ Twitter
Virat Kohli @ Twitter

Virat Kohli Trolled: टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू विराट कोहली (Cricketer Virat Kohli) पुन्हा एखदा अडचणीत आला. एका चुकीमुळे विराट कोहली सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. राष्ट्रगीत सुरु असताना विराट कोहलीने असे काही लाजिरवाणं कृत्य केलं आहे की त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका (Viral Kohli Trolled) केली जात आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत असून यावर नेटीझन्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Also Read:

You may like to read

केपटाऊनमध्ये (Cape Town) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात तिसरा वनडे सामना (One Day Match) खेळला जात आहे. पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तिसरा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली. पण सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने जे काही कृत्य केले त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राष्ट्रगीत सुरु असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडून राष्ट्रगीत म्हणण्यात मग्न आहेत. पण विराट कोहली राष्ट्रगीत (National Anthem) सुरु असताना च्युइंगम चघळण्यात व्यग्र आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरुनच विराट चागंला ट्रोल झाला आहे. त्याचे हे कृत्य अतिशय लाजिरवाणं असून नेटकरी संतप्त झाले आहेत.

विराट कोहलीच्या या कृत्यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकाने या व्हिडिओवर कंमेट करत ‘तुला बीसीसीआय (BCCI) आवडत नसेल तर पाकिस्तानात (Pakistan) जा.’, असे लिहिले आहे. तिन्ही फॉरम‍ॅटचं कॅप्टनपद (Captaincy) सोडल्यानंतर विराट कोहली आपल्या फलंदाजीकडे लक्ष केंद्रीत करत आहे. पण यावेळी पुन्हा एकदा वन डेमध्ये त्याच्या हाती अपयश आले आहे. ऐवढेच नाही तर वन डेच्या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीलाच त्याने केलेल्या कृत्यामुळे तो अडचणीत आला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 24, 2022 7:54 AM IST

Updated Date: January 24, 2022 8:01 AM IST