Top Recommended Stories

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं खातं उघडलं, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं रौप्य पदक

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या दुसऱ्या दिवशी भारताचे खाते उघडले आहे. संकेत सरगरने वेट लिफ्टिंगमध्ये देशाला पहिले रौप्यपदक मिळवून दिले आहे.

Updated: July 30, 2022 5:16 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं खातं उघडलं, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं खातं उघडलं, संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक

CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) दुसऱ्या दिवशी भारताचे खाते उघडले आहे. संकेत सरगरने (Sanket Sargar) वेट लिफ्टिंगमध्ये देशाला पहिले रौप्यपदक मिळवून दिले (India’s first silver ) आहे. संकेत सुवर्णपदकापासून थोडा दूर राहिला परंतु त्याने रौप्य पदक (silver medal) जिंकून देशाचा मान वाढवला आहे. संकेतने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग (weightlifting) करताना ही चमकदार कामगिरी केली आहे. संकेतने एकूण 248 किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅच राऊंडमध्ये 113 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. यादरम्यान त्याला चुकून दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मलेशियाच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागला.

Also Read:

मलेशियाच्या मोहम्मद अनिकने क्लीन अँड जर्कमध्ये 249 किलो (107किलो+142 किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमाराने 225 किलो (105 किलो+120 किलो) वजन उचलून कांस्य पदक पटकावले.

You may like to read

संकेतसरगरने स्नॅच विभागात त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि क्लीन अँड जर्कमध्ये सहा किलोग्रॅमने आघाडी घेतली होती. परंतु क्लीन अँड जर्क विभागात तो फक्त एक लिफ्ट करू शकला कारण तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुस-या आणि तिसर्‍या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्यात तो अयशस्वी झाला. गेल्या हंगामात भारतीय लिफ्टर्सनी पाच सुवर्णांसह नऊ पदकांची कमाई केली होती. या वर्षीही ते अशी कामगिरी करतील अशी भारतीयांना अपेक्षा आहे.

दरम्यान या स्पर्धेच्या पहिल्या दिवस भारतीयांसाठी महत्त्वाचा होता. शुक्रवारी भारतीय बॅडमिंटन संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5-0 ने पराभूत केले. स्टार पीव्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सरळ सेटमध्ये हा विजय मिळवला. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने घानावर 5-0 असा विजय मिळवत आपलं खातं उघडलं. भारताच्या महिला क्रिकेट संघाने जोरदार झुंज दिली मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ऐतिहासिक क्रिकेट सामन्यात विमेन इन ब्लू संघाला ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेट्सनी पराभव स्विकारावा लागला.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या