Top Recommended Stories

DC vs MI Score IPL 2022: दिल्लीने मुंबईकडून खेचून आणली विजयश्री, 'हे' दोन क्रिकेटर ठरले विजयाचे शिलेदार

आयपीएलच्या 15 व्या सीझनची (IPL 2022) दुसरी लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्समध्ये (Mumbai Indians vs Delhi Capitals) मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडिअमवर झाली. दिल्लीने मुंबईवर (Mumbai Indians) 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने ते 10 चेंडू शिल्लक असतानाच गाठले.

Published: March 27, 2022 9:04 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

IPL 2022: Delhi Capitals Defeat Mumbai Indians By 4 wickets, Axar Patel, Lalit Yadav Shine
DC vs MI: A 70-run partnership in just 30 balls between Patel and Lalit Yadav enabled Delhi to chase down the 177 runs in 18.2 overs.

MI vs DC Score IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या सीझनची (IPL 2022) दुसरी लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्समध्ये (Mumbai Indians vs Delhi Capitals) मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडिअमवर झाली. दिल्लीने मुंबईवर (Mumbai Indians) 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने ते 10 चेंडू शिल्लक असतानाच गाठले. अक्षर पटेल (Akshar Patel) आणि ललित यादव (Lalit Yadav) हे दोघे दिल्लीच्या विजयाचे खरे शिलेदार ठरले. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी मैदानात निमंत्रित केले. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी निर्धारित षटकात 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी आणि 10 चेंडू राखून मुंबईला पराभवाची धूळ चाखवली.

You may like to read

ईशान किशनची खेळी व्यर्थ गेली…

मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या लढतीची दमदार सुरुवात केली. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीच्या जोडीने चौकार-छटकार लगावले. रोहितने 41 धावांचे योगदान दिले तर ईशानने शानदार कामगिरी करत 48 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. परंतु ईशान किशनच्या खेळीवर दिल्लीच्या फलंजांनी पाणी फिरवले. मुंबई संघाला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

5 वेळा चॅम्पियन ठरला आहे मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने सन 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या सीझन लिलावात डिव्हाल्ड ब्रेव्हिस, ईशान किशन, टिम डेव्हिड, टाइमल मिल्स आणि डॅनियन सॅम्ससारखे क्रिकेटपटूंना खरेदी केले आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबई संघाचे नेतृत्त्व करतोय. त्यांच्या नेतृत्त्वात मुंबईने 130 लढती खेळल्या. त्यापैकी 75 लढतीत विजय मिळवला तर 51 लढतीत परभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 31 लढतीत मैदानात एकमेकांच्या विरोधात उतरले. त्यापैकी 16 लढतीत मुंबई इंडियन्सने विजय पटकावला तर 15 लढती दिल्ली कॅपिटल्सने जिकंल्या.

ललित यादव-अक्षर पटेल

असे आहेत प्लेइंग XI:

MI: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, कीरोन पोलार्ड, टीम डेव्हिड, डेनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टाइमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.

DC: पृथ्वी शॉ, टीम सीफर्ट, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), रोवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.