Eng vs NZ Lord’s Test : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर झालेला कसोटी सामना (Lord’s Test) अनिर्णित राहिला. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं (Kane Williamson) आपलं लक्ष दुसर्‍या कसोटी सामन्यावर केंद्रित केलं आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना एजबॅस्टन इथं 10 जूनपासून सुरू होईल. या कसोटीपूर्वी कर्णधार केन विल्यमसनं सांगितलं की त्याचा संघ याठिकाणी नव्याने सुरुवात करेल. पहिल्या कसोटी सामन्यात किवी संघानं यजमान इंग्लंडला 273 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्यांच्याकडे खेळण्यासाठी केवळ दोनच सत्र बाकी होते. त्यामुळं इंग्लंडने हा सामना ड्रॉ केला. त्यानंतर कीवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनने अशा परिस्थितीत त्याच्या संघाला हे लक्ष्य मिळालं असतं तर ते जिंकण्यासाठी मैदानात उतरले असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. Also Read - New Zealand ने 22 वर्षांनतर England मध्ये जिंकली टेस्ट सीरीज; कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी धडक

लॉर्ड्स कसोटीनंतर (Lord’s Test) कर्णधार केन विल्यमसननं सांगितलं, पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी खेळपट्टी एवढी खराब नव्हती, जेवळी त्याला अपेक्षा केली होती. 273 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने सामना संपेपर्यंत 3 गडी गमावून 170 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून डोमिनिक सिब्ले 207 चेंडूत 3 तीन चौकारांच्या मदतीने 60 धावांवर आणि ओली पोप 41 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीनं 20 धावांवर नाबाद राहिला. Also Read - इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या प्रमुख ऑलराउंडरच्या भूमिकेत दिसेल रवींद्र जडेजा

विल्यमसनने सामन्यानंतर सांगितले की, ‘आम्ही डाव घोषित करण्याचा या आधारावर घेतली की, सामना जिंकण्याची उत्तम संधी आहे किंवा विकेट्स घेण्यासाठी पुरेशी षटके आहेत. आम्हाला माहित होतं की एका दिवसात पराभूत करणं कठीण असेल, मात्र दुर्दैवानं शेवटी परिस्थिती थोडी खराब झाली. खेळपट्टी आणखी खराब होईल अशी आमची अपेक्षा होती आणि चार दिवसांनंतर ते घडणार असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. ‘

दरम्यान, केन विल्यमसन म्हणाला की, “जर त्यांचा संघ अशा लक्ष्याच्या पाठलाग करत असता, तर ते जिंकण्यासाठी खेळले असते. तो म्हणाला, “लक्ष्याचा पाठलाग करताना विरोधी संघ कसा खेळेल हे माहित असणं कठीण असतं. जर आम्ही त्या स्थितीत असतो तर सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता. लक्ष्यापर्यंत पोहोचनं नक्कीच सोप नव्हतं, त्यासाठी बरीच मेहनत हवी होती. अनेक षटकंही बाकी होती. पण मला वाटतं की दोन्ही संघ खेळपट्टी आणखी खराब होण्याची वाट पाहत होते.